नुकसानग्रस्तांना मदतीचा दुसरा हप्ता उद्या मिळणार ?



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात सप्टेंबर आणि नोव्हेंंबर महिन्यांत अतिवृष्टी आणि अवेळी पावसाने शेतकर्‍यांचे 485 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने मदतीचा अहवाल तयार करून शासनाकडे भरपाईसाठी पाठविला होता. त्यानुसार सरकारने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी 135 कोटी 55 लाख रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला होता. यातील दुसर्‍या टप्प्यातील निधी उद्या (सोमवारी) मिळणार असल्याचे संकेत विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी माध्यमांशी बोलतांना दिले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी विभागीय आयुक्त माने यांच्याकडे केली असून पहिल्या हप्त्यातील जवळपास 80 टक्के रक्कम तालुका पातळीवर आणि तेथून शेतकर्‍यांपर्यंत वर्ग करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्तांना कळविले आहे.

जिल्ह्यात अवेळी आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रशासनातर्फे जिरायती, बागायती आणि फळबागा मिळून 4 लाख 54 हजार हेक्टर बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले. फटका बसलेल्या शेतकर्‍यांची संख्या 6 लाख 36 हजार 146 आहे. जिल्ह्यातील नुकसानीचा हा अहवाल कृषी आयुक्त यांच्यामार्फत शासनदरबारी होता. त्यानूसार नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात शासनाकडून 135 कोटी 55 लाख रुपयांचे अनुदान काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले होते. त्यापैकी 124 कोटी 19 लाखांचा निधी बँकेत वर्ग करण्यात आला. या मदतीचे वाटप तालुकास्तरावरून करण्यात येत आहे.

खरीप हंगामात हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. पावसामुळे घटलेला जलस्तर वाढला आहे. मात्र बाजरी, मका, सोयाबीन, कांदा, कपाशी, फळबागा आदी पिकांचे फड उद्ध्वस्त केले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली. राज्य शासनाला पाठविलेल्या शासनाला पाठविलेल्या 475 कोटींच्या अहवालानुसार, 135 कोटी 55 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी 124 कोटी बँकेत वर्ग झाले.

दरम्यान, नुकसानीच्या दुसर्‍या हप्त्यासंदर्भात विभागीय आयुक्त माने यांनी संकेत दिले आहेत. सोमवारी मदतीचा दुसरा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही मदत आल्यानंतर तातडीने ती बाधीत शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. 475 कोटींच्या अहवालानुसार, 135 कोटी 55 लाख रुपये हे पहिल्या टप्प्यातील अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी 124 कोटी बँकेत वर्ग झाले.
दरम्यान, नुकसानीच्या दुसर्‍या हप्त्यासंदर्भात विभागीय आयुक्त माने यांनी संकेत दिले आहेत. सोमवारी मदतीचा दुसरा हप्ता प्राप्त होण्याची शक्यता आहे. ही मदत आल्यानंतर तातडीने ती बाधीत शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post