या आठ जिल्ह्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी जानेवारीत मतदान


फोटो संग्रहित


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यातील विविध आठ जिल्ह्यांमधील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ९ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

मदान यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व ठिकाणी नामनिर्देशनपत्रे १९ ते २४ डिसेंबर २०१९ या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी २६ डिसेंबर २०१९ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ३० डिसेंबर २०१९ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान ९ जानेवारी २०२० रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १० जानेवारी २०२० रोजी होईल.

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

अहमदनगर - ८,

नाशिक - ६

ठाणे- २

जळगाव- ७

यवतमाळ- ४

नागपूर- २

औरंगाबाद- २

सातारा- ३

एकूण - ३४

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post