या खाडीत ९ पर्यटक बुडाले; वृद्धेचा मृत्यू



माय अहमदनगर वेब टीम
सिंधुदुर्ग -  मालवण तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करत असताना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक नौका कलंडून नौकेतील ९ पर्यटक पाण्यात फेकले गेले. यापैकी ८ जणांना वाचवण्यात यश आलं आहे तर या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. माया आनंद मोरे (६०) असे या महिलेचे नाव असून त्या कल्याणमधील आंबिवली येथील रहिवाशी आहेत.

कोकण किनारपट्टीवर वादळाचा इशारा देण्यात आला असून किनारपट्टी व खाडीपट्ट्यात सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्याचाच फटका पर्यटकांच्या नौकेला बसला व ही नौका कलंडून दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. देवबाग संगम खाडीपात्रात आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण परिसरातील पर्यटकांचा ग्रुप देवबाग येथे आला होता. आज दुपारी नौकाविहार करत असतानाच साडेबारा वाजताच्या सुमारास ही पर्यटक नौका सोसाट्याचा वाऱ्यामुळे एका बाजूला कलंडली आणि नौकेतील ९ पर्यटक खाडीपात्रात पडले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छिमारांनी प्रसंगावधान दाखवत धाव घेतली व पाण्यात बुडालेल्या सर्व पर्यटकांना बाहेर काढले. या सर्वांना तातडीने मालवणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारापूर्वीच माया माने या वृद्धेचा मृत्यू झाला तर अनया अमित अडसुळे (बदलापूर) ही ३ वर्षांची चिमुकली गंभीररित्या जखमी असून तिची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे सांगण्यात आले.

हे सर्वजण सुखरूप...
१. लता बाळासाहेब शीलवंत (वय- ५७, रा. डोंबिवली मानपाडा)
२. नंदा विलास अडसुळे (वय- ५७, रा. बदलापूर)
३. विहान विशाल अडसुळे (वय- ३)
४. सांची विशाल अडसुळे (वय- ६)
५. स्वाती अडसुळे
६. अमित अडसुळे
७. संघमित्रा विशाल अडसुळे

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post