माय अहमदनगर वेब टीम
मुंबई -विधानसभा अध्यक्षपदाची आज होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपाने आपला उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाने याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. सकाळी ११ वाजता याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
याबाबत माहिती देताना, भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, काल रात्रीपासूनच सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांनी आम्हाला वारंवार आवाहन केले होते की, विधानसभा अध्यक्षपद हे वादातीत असावे यासाठी भाजपाने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा.
या पार्श्वभूमीवर सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक होऊन चर्चा झाली. या चर्चेअंती असा निर्णय झाला की, महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे की अध्यक्षांचे पद हे वादात आणायचे नाही. त्यामुळे ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही आमचे उमेदवार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे पाटील यांनी सांगितले.
Post a Comment