माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा आज पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत खात्मा झाला. त्यानंतर देशभरातून दोन वेगवेगल्या प्रतिक्रीया येत आहेत. सामान्य लोकांनी या निर्णयाचे स्वागत केले असले तरी काहींनी संविधानाबाहेरील घटना असल्याचे सांगितले आहे. यातच "पोलिसांनी केलेला एन्काउंटर अयोग्य आणि कायद्याला धरुन नव्हता, असे परखड मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले आहे.
उज्वल निकम म्हणाले की, "झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. चंबळचे दरोडेखोरही झटपट न्याय द्यायचे, परंतु शेवटी ते दरोडेखोरच.आरोपी पोलिसांकडील बंदूक हिसकावून पळत होते आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितलं जात आहे. मात्र, यात संशयाला जागा आहे. आरोपींनी पोलिसांची शस्त्रे हिसकावून घेतली, असं घटकाभर गृहित धरले, तरी प्रश्न पडतो की पोलिस एवढे बेसावध आणि निष्काळजी होते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तसेच, "प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे, तसा पोलिसांनाही आहे. मात्र, हा अधिकार कधी वापरायचा याचेही काही निकष आहेत. एखाद्याचा जीव जात असेल तरच तो समोरच्याचा जीव घेऊ शकतो.
Post a Comment