सोनिया गांधीकडून शिवसेनेसोबत आघाडी करण्यास हिरवा कंदील ?





माय नगर वेब टीम
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील शिवसेनेसोबत आघाडी करण्यास काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संमती दिली आहे. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. नवी दिल्लीत राष्ट्रवादीसोबत काँग्रेसची मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीत सोनिया गांधी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, ए. के. अँटोनी, के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. दिल्लीत वेगवान घडामोडी सुरू असून सोनियांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू मुंबईतून सरकून आता दिल्ली झाला आहे. भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र काँग्रेसमधून काही नेत्यांचा तसंच खुद्द सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्यास विरोध असल्याने चर्चा लांबणीवर पडत होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील जोपर्यंत काँग्रेसकडून होकार येत नाही तोपर्यंत शिवसेनेला पाठिंबा दर्शवणार नाही सांगितलं होतं. यामुळे काँग्रेस काय भूमिका घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सोनियांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेसचे राज्यातील हे सर्व प्रमुख नेते थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील जनपथ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. तिथे राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते आधीच उपस्थित असून दोन्ही पक्षांच्या या संयुक्त बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post