कुटूंबात दुसर्या मुलीचे स्वागत होते ही सकारात्मक गोष्ट - डॉ.अमोल जाधव



माय नगर वेब टीम
अहमदनगर - मुलगी नको म्हणून स्त्री भ्रुण हत्याचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत पहिली मुलगी असतांनाही, दुसरी मुलगी झाली तरी आनंद व्यक्त करणार्या कुटूंबांची संख्याही वाढतांना दिसत आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे. स्त्री जन्माचा घटता दर ही मोठी सामाजिक समस्या आहे. समाजातील सुशिक्षित लोकांनीच या चळवळीत पुढाकर घेऊन स्त्री जन्माचे स्वागत करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला पाहिजे. आमच्या सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने स्त्री जन्माचे नेहमीच स्वागत केले आहे. आज तुपे कुटूंबियांना झालेल्या दुसर्या मुलीचेही स्वागत मोठ्या आनंदाने हॉस्पिटल व तुपे कुटूंबियांच्यावतीने करण्यात येऊन समाजापुढे एक आदर्श ठेवण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन डॉ.अमोल जाधव यांनी केले.

माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांना दुसर्यांदा मुलगी झाल्यानंतर स्त्री जन्माचे स्वागत केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी डॉ.अमोल जाधव, डॉ.प्राजक्ता जाधव, डॉ.संगीता इंगळे, सौ.अनिता तुपे, गोविंद तुपे, अंतरा तुपे आदि.

याप्रसंगी अशोकराव तुपे म्हणाले, मुलगा-मुलगी असा कोणताही आम्ही भेद मानत नाहीत, त्यामुळे पहिली मुलगी झाल्यावरही आनंद व्यक्त केला होता आणि आजही दुसरी मुलगी झाल्यावर आम्ही आनंदी आहोत. या मुलींनी मोठे करुन त्यांना उच्च शिक्षित करुन समाजात मानाचे स्थान मिळवू देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सरस्वती हॉस्पिटलच्यावतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक असा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post