नगरच्या व्यावसायिकाला सव्वातीन लाखांचा गंडा
माय नगर वेब टीम
अहमदनगर – मोबाईलचे दुकान टाकल्याचे भासवित नगरच्या व्यावसायिकाला सव्वातीन लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. मुंबईच्या ठगाने ही फसवणूक केल्याची तक्रार कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
मार्केट यार्डातील प्रितम रामनाथ तोडकर (रा. निळकंठ हाउसिंग सोसायटी) यांची फसवणूक झाली असून त्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. निलेश सतीश चौहान (हल्ली रा. कायनेटिक चौक, मुळ मुंबई) असे फसवणूक करणार्याचे नाव आहे.
निलेश चौहान याने साई मोबाइल झोन नावाचे दुकान नगरमध्ये सुूरू केले. तोडकर यांना ओळखपत्र, पॅन कार्डची झेरॉक्स देऊन त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे मोबाईल हँडसेट, टीव्ही, प्रीपेड बॅलेन्स खरेदी केले. सुरुवातीस चौहान याने रोख स्वरूपात पैसे देत तोडकर यांचा विश्वास संपादीत केला.
तोडकर यांच्याकडून चौहाने याने उधारीवर वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन टीव्ही प्रीपेड व ऑनलाईन बॅलन्स असा 3 लाख 13 हजार 809 रुपयांचा माल माल खरेदी केला. व्यवहार सुरळीत असल्याचे पाहून तोडकर यांनीही माल दिला. काही दिवसांतच चौहान याने मोबाईल दुकान बंद करून गाशा गुंडाळला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तोडकर यांनी पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला.
Post a Comment