
श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीची नवी कर्ज योजना
माय नगर वेब टीम
अहमदनगर - नगरमधील प्रथितयश व सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची पतसंस्था अशी ओळख असलेल्या श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी.लि.ने उत्कृष्ट आर्थिक कामगिरीची परंपरा सातत्याने कायम राखली आहे. प्रगतीपथावर असलेल्या संस्थेने आपल्या कर्ज योजनेचा विस्तार करीत सोनेतारणावर कॅश क्रेडिट कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. दि. 1 डिसेंबर 2019 पासून हि नवी कर्ज योजना सुरु होत आहे. फक्त 9.50 टक्के व्याजदराने या योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश चांडक यांनी दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन श्रीगोपाल धूत, व्हाईस चेअरमन गोपाल मणियार, सोनेतारण कर्ज उपसमिती प्रमुख प्रकाश गांधी उपस्थित होते.
संस्थेच्या या सोनेतारण कॅशक्रेडिट कर्ज योजनेबाबत अधिक माहिती देताना चेअरमन ओमप्रकाश चांडक यांनी सांगितले की, सर्वोत्कृष्ट ठेव योजना व कर्ज योजनांसाठी श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी सर्वत्र नावाजली जाते. संस्थेने नेहमीच नाविन्यपूर्ण कर्ज योजना आणून त्या यशस्वीरित्या राबविल्या आहेत. आताच्या सोनेतारण कॅश क्रेडिट योजनेत तारणावर 50 लाख रुपयापर्यंत कॅश क्रेडिटची सुविधा मिळणार आहे. सदरच्या कर्जासाठी काही अटीशर्तींसह फक्त 9.50 टक्के व्याजदर लागू असेल. या कर्जासाठी जामीदारांची गरज नसून प्रॉपर्टीही तारण ठेवायची गरज नाही. योग्य कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर अवघ्या 10 मिनिटांत सोनेतारण कॅश क्रेडिट कर्ज मंजूर केले जाईल. संस्थेच्या माळीवाडा, जुन्या वसंत टॉकीज येथील मुख्य कार्यालयासह कुष्ठधाम रोड, सोनानगर चौक येथील सावेडी शाखेतही ही सुविधा असणार आहे. संस्थेने कोल्ड स्टोरेजमधील मालाच्या तारणावरही कर्ज सुविधा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग व्यवसायाला चालना देणारी संस्थेची कर्ज योजना अतिशय उपयुक्त व उत्कर्ष साधण्यासाठी मोलाची मदत करणारी ठरणार आहे. ग्राहकांनी या कर्जयोजनेच्या अधिक माहिती व लाभासाठी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.
Post a Comment