माय नगर वेब टीम -
जीवनसत्व हे मानवी शरीरासाठी खूप महत्वाचे असतात. जीवनसत्व ई हे अनेक गोष्टीत फायदेशीर असते. आज आपण जाणून घेऊ ई जीवनसत्वाचे स्त्रियांच्या आरोग्यासाठी काय काय फायदे होतात:
1) स्त्रियांसाठी ई जीवनसत्व फारच महत्वाचं आहे.
2) मासिक पाळीपूर्वी होणाऱ्या ओटीपोटातल्या वेदना, अचानक अंगाला जाणवणाऱ्या गरम लाटांच्या संवेदना अशा त्रासांपासून ई जीवनसत्त्वामुळं बचाव होतो.
3) गर्भार स्त्रियांचा अचानक वाढणारा रक्तदाब आणि त्यामुळे काही वेळा येणारी फीट हे त्रासही कमी होतात. चेहेऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्यासुद्धा ई जीवनसत्वामुळे नाहीशा होतात, कांती सतेज होते.
4) म्हणून चेहऱ्याला लावायच्या अनेक क्रीममध्ये ई जीवनसत्वाचा वापर केला जातो. इतकंच नव्हे तर केसांच्या गळतीला पण आळा घालण्याचे काम ई जीवनस्त्व करतं.
Post a Comment