अजित पवारांच्या राजीनाम्या नंतर शरद पवार विचार मंचच्या वतीने आनंदोत्सव साजरा



माय नगर वेब टीम

अहमदनगर - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजिनामा दिल्याबद्दल तसेच शरद पवार यांच्या विचारांचा विजय झाल्याबद्दल आज दुपारी शरद पवार विचारमंचच्या वतीने देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

गेल्या महिन्याभरापासून राजकीय परस्थिती अतिशय बिकट बनत चालली होती. राजकारणात वेगळे वेगळे वळन मिळत होते. यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदी अचानक शपथविधी ही गोष्ट महाराष्ट्रातीन जनतेला न पटणारी होती. यावरुन नवीन वाद निर्माण झाला होता. मात्र, या सर्व परस्थितीला योग्य रितीने शरद पवार यांनी हाताळुन सर्वांना बरोबर घेऊन योग्य दिशेने महाराष्ट्राची वाट सुरु केली आहे. यावरुन शरद पवार विचार मंचच्या वतीने सत्याचा विजय झाल्याबदल आणि खोटे तोंडघशी पडल्या बद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी बोलताना संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणा कधी नव्हे इतका मोठा निर्णय महाराष्ट्राची जनता झोपली असताना घेवून महत्त्वाचे पद समजले जाणारे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शथप घेतली. मात्र, बहुमत नसताना देखील हा खटाटोप पैशाच्या आणि मसल पावरच्या जोरावर केला गेला. परंतु महाराष्ट्रात शरद पवार यांच्या विचारांनी आज युवक प्रेरीत झाले आहे. यातुन नवीन क्रांती घडणार आहे. भविष्यात युवकांनी आता शरद पवार यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. देशाला दिशा देण्याचे काम आता महाराष्ट्रातुन होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी बहुजन समाजाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच एकमेकांना पेढे भरवण्यात आले, यानंतर फटाक्याची आतिशबाजी करण्यात आली, या प्रसंगी अल्ताफ सय्यद, बबन बारसकर, सय्यद नदीम, अजीज बडे, भैय्या पठाण, अभय पतंगे, शफी बागवान, आयान सय्यद, जीशान सय्यद, हजिक सय्यद आदीस संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post