माय नगर वेब टीम
अहमदनगर - एका गुन्ह्याच्या प्रकरणातील आरोपीला चौकशीनिमित्त ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाची गचांडी पकडून धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना माळीवाड्यात घडली.
अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. इवळे गल्ली, माळीवाडा, अहमदनगर) हे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, एका गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस कर्मचारी संदीप हेमंत थोरात हे माळीवाड्यातील इवळे गल्लीत गायकवाड याच्या घरी गेले. गुन्ह्याचे तपास कामी त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता थोरात व इतर पोलीस कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ, दमदाटी केली. थोरात यांची गचांडी पकडून धक्काबुक्की केली. थोरात करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी गायकवाड यास ताब्यात घेतले.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी संदीप थोरात यांच्या फिर्यादीवरून अनिल गायकवाड याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास वाघ हे तपास करीत आहेत.
Post a Comment