आगामी 5 वर्षात नगर शहराला महानगरचा लुक देणार
माय नगर वेब टीम
अहमदनगर- खत निर्मिती प्रकल्पाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे सावेडी कचरा डेपो बंद होणार आहे. तपोवन रोडचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. सावेडी उपनगरामध्ये सुसज्ज असे आरोग्य केंद्र उभे करणार आहे, तसेच जलतरण तलाव निर्माण करणार आहे. लक्ष्मीनगर येथे 1 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक निर्माण केला आहे. पाईपलाईन रोड व तपोवन रोडच्या दरम्यान उद्यानाची निर्मिती करणार आहे. विकासाचा संकल्प हाच ध्यास घेऊन शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. पुढील पाच वर्षामध्ये अधिक जोमाने काम करून नगर शहराची वाटचाल महानगराकडे करणार आहे. सर्वांगिण विकास हाच अजेंडा घेऊन काम करणार आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक 1 मध्ये आयोजित कार्यक्रमात आ.संग्राम जगताप बोलत होते. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर, नगरसेविका दिपाली बारस्कर, मिनाताई चव्हाण, नगरसेवक सागर बोरूडे, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, कुमार वाकळे, विनित पाऊलबुधे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सुनिल त्र्यंबके, राजेंद्र तागड, स्वप्निल ढवण, सतिष ढवण, प्रा.माणिक विधाते, दगडूमामा पवार, संजय बुधवंत, शिवाजी साळवे, अरूण मतकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मागील पाच वर्षामध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करू शकलो. सर्वात महत्वाचा प्रश्न तपोवन रस्त्याचे काम मार्गी लावले तसेच या भागात कचरा डेपोमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता तोही प्रश्न आ.संग्राम जगताप यांनी मार्गी लावला आहे. या प्रभागामध्ये फक्त विकासाचे राजकारण केले जाते असे ते म्हणाले.
नगरसेविका दिपाली बारस्कर म्हणाल्या की, विकासाची संकल्पना घेऊन काम करत असल्यामुळे प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. प्रभागाचा सर्वांगिण विकास हाच ध्यास घेऊन काम केले आहे. आ.संग्राम जगताप यंच्या नेतृत्वाखाली उपनगरातील महिलांचे संघटन केले जाणार आहे. त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. उपनगर हे शहराचे विकासाचे मॉडेल असेल. नागरिकांच्या सहकार्यामुळेच आम्ही सर्वजण हे काम करू शकतोे. पुढील पाच वर्षांसाठी आ.संग्राम जगताप यांना विकासकामासाठी संधी द्यावी अशी अपेक्षा करते. यावेळी निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर आदींचे भाषणी झाली.
यावेळी मल्हार महासंघाच्यावतीने अध्यक्ष अरुण मतकर यांनी आ.संग्राम जगताप यांना पाठिंबा जाहिर केला. प्रास्तविक डॉ.सागर बोरुडे यांनी केले. आभार नगरसेविका मिनाताई चव्हाण यांनी मानले.
Post a Comment