शांत झोपेसाठी …
माय नगर वेब टीम
हे लक्षात ठेवा
– योग्य व पुरेशी झोप घ्या.
– दिवसातून किमान तीस मिनिटे व्यायाम करा.
– दिवसा डुलकी काढू नका.
– रात्रीच्या जेवणात अतिरिक्त मसालेदार, तेलकट पदार्थ टाळा. त्यामुळे आम्लाचा त्रास होतो.
– दिवसभर पाण्याचे प्रमाण अधिक ठेवा. मात्र, रात्री झोपण्याआधी अतिरिक्त पाणी वा इतर पेये टाळा.
झोप न येण्याचा त्रास असेल, झोपलेल्या स्थितीत दीर्घ श्वासोच्छ्वास करा, हळूहळू शांतपणे स्नायूंमधील ताण कमी करा, अवयव सैल सोडा. पाय, हात, खांदे या अवयवांना शवासनात असतो, तसा संदेश द्या. त्यामुळे शरीरावरील ताण कमी होऊन मेंदूकडे झोप येण्याचा संदेश जातो. व्यसनांमुळे, काही विशिष्ट गोळ्यांनी झोपेचे चक्र बिघडते. त्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्यसनांपासून दूर राहा. झोपेच्या वेळा बदलू नये. कोणतीही गोळी, अमली पदार्थांचा वापर करू नये. झोपेची तक्रार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. झोपेच्या आधी दोन तास मनस्थिती खराब होईल, असा कोणताही मानसिक त्रास करून घेऊ नका. चहा, कॉफी; तसेच अमली पदार्थाचे सेवन करू नका. टीव्ही, मोबाइलपासून किमान तासभर तरी दूर राहा. मोबाइलच्या प्रकाशामुळे डोळ्यांवर आलेली झोप दूर जाते. सतत झोपेच्या जागा आणि ठेवण बदलू नका. कितीही वाजता झोप लागली, तरी उठण्याची वेळ बदलू नका. त्यामुळे झोपेचे चक्र बिघडणार नाही.
Post a Comment