आयटीपार्कमुळे शहराला मिळाला ग्लोबल टच..!



माय नगर वेब टीम
अहमदनगर- नगर एमआयडीसीतील आयटीपार्क कार्यान्वित झाल्यामुळे नगर शहराला ग्लोबल टच लाभला आहे. या आयटीपार्कमध्ये एकुण 4 कंपन्यांचे 9 प्रकल्प सुरु असून यामध्ये सुमारे 400 युवक-युवती कार्यरत असून ते देशच नव्हे तर संपुर्ण जगाच्या कानाकोपर्‍याशी कनेक्ट झाले आहेत. 19 वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या आयटीपार्कच्या इमारतीला यामुळे आता नवी झळाळी मिळाली आहे.



सन 2001 मध्ये राज्याचे तत्कालिन उद्योगमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांनी नगर एमआयडीसीमधील आयटीपार्कला मंजुरी दिली होती. त्यासाठी 5 हजार 625 चौरस मिटरचा भुखंड राखीव ठेवण्यता आला होता. याठिकाणी 2 हजार 286 चौ.मी. बांधकाम करुन 3 मजली अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली इमारत बांधण्यात आली. या इमारतीत 300 चौ.फुटांपासून 900 चौ. फुटांपर्यंत एकुण 44 गाळे आहेत. मात्र त्यावेळी आयटी क्षेत्रातील कंपन्यांशी म्हणावा तसा संपर्क साधला गेला नाही. किंवा या कंपन्या नगरमध्ये याव्यात यासाठी पाठपुरावाही झाला नाही. त्यामुळे आयटीक्षेत्रातील कंपन्यांनी नगरऐवजी पुणे-मुंबई या शहरांनाच पसंती दिली. परिणामी गेल्या 19 वर्षांपासून आयटीपार्क धुळखात पडून होते. 5 वर्षांपूर्वी एमआयडीसीने जागा आयटी कंपन्यांना देण्यासाठी जाहिर निविदा मागविल्या होत्या मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. आयटीपार्कचे महत्व लक्षात घेऊन शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या 3 वर्षांपासून आयटी कंपन्यांशी संपर्क साधत सातत्याने पाठपुरावा केला. त्यासाठी दिल्ली, अहमदाबाद, बैंगलोर, हैदराबाद याठिकाणी दौरेही केले. अखेर त्यांच्या पाठपुराव्यास यश आले व काही कंपन्यांनी नगरमध्ये काम करण्यास उत्सुकता दाखविली.

पहिल्या टप्प्यात चार कंपन्या झाल्या कार्यान्वित

गेल्या जुलै महिन्यात आयटीपार्क सुरु करण्याचे निश्‍चित झाले. पहिल्या टप्प्यात चार कंपन्यांनी नगरमध्ये काम करण्यास तयारी दर्शविली. त्यामुळे गेली 19 वर्षे धुळखात पडून असलेली आयटीपार्कची इमारत डागडुजी करुन सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज करण्यात आली. सानिवा इन्फोटेक, फोरसाईट सर्व्हिसेस, युनिव्हर्सल सिक्युरीटी सिस्टिम व केएसआयटी सोल्युशन प्रा.लि. या चार कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नगरमध्ये येऊन आयटीपार्कमध्ये काम करण्यास इच्छुक युवक-युवतींच्या मुलाखती घेतल्या. पहिल्या टप्प्यातील 350-400 जागांसाठी सुमारे 7 हजार युवक-युवतींनी मुलाखतींना हजेरी लावली. त्यापैकी निवडलेल्या 400 युवक- युवतींना 15 दिवस ते 1 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे व या चार कंपन्यांमार्फत 9 प्रकल्प याठिकाणी ऑगस्टअखेर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत.

डिसेंबरपर्यंत आणखी पाच कंपन्या सुरु होणार

आयटीपार्कमध्ये सध्या चार कंपन्या 9 प्रकल्पांवर काम करत असून आणखी 5 कंपन्या डिसेंबर अखेरपर्यंत सुरु होणार आहेत. त्यामुळे सुमारे 1 हजार युवक- युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. या आयटीपार्कमध्ये 12 वी पासून ते पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार कार्यरत आहेत. त्यांना दरमहा 10 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत पगार देण्यात येत आहे. सध्या कार्यरत असलेल्या चार कंपन्यांमार्फत युएस कंपनीज् लाईफ इन्शुरन्स, युएस बेस्ड कंपनी मल्टीइन्शुरन्स प्रोजेक्ट, इ-बुक, एचटीएमएल प्रोसेस, फोटो अॅण्ड व्हिडीओ प्रोसेस फॉर सेव्हरल वेबसाईटस्, चिफ मॅन्युफॅक्चरींग प्रोजेक्ट ऑफ अमेरिकन एअरलाईन्स, प्रोजेक्ट फॉर ऑस्ट्रेलियन हेल्थ इन्शुरन्स कंपनी, इंटरनॅशनल अॅण्ड डोमेस्टिक व्हाईस प्रोजेक्ट यावर कामकाज सुरु आहे.

डिसेंबरपर्यंत ज्या चार-पाच कंपन्या नव्याने नगरमध्ये येणार आहेत त्या सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्या असणार आहेत. त्या कंपन्या कार्यान्वित झाल्यावर रोजगार निर्मिती तर होणार आहेच शिवाय नगर शहर या निमित्ताने जगाच्या नकाशावर झळकणार आहे. नगर शहराला पुणे, हैदराबाद, बेंगलोर सारखे आयटी हब म्हणून नावारुपास आणण्याचा प्रयत्न असल्याचे या आयटीपार्कचे समन्वयक गौरव नय्यर यांनी सांगितले. आयटी पार्कच्या अधिक माहितीसाठी  www.
sanivaainfotech.com तसेच  www. foresight.net या संकेतस्थळाला भेट देण्याची आवाहन करण्यात आले आहे.

सिमकार्ड, मेमरीकार्ड फॅक्ट्री व कॉलसेंटरही सुरु होणार
या आयटीपार्कमध्ये मोबाईल सिमकार्ड व मेमरीकार्ड उत्पादित करण्याची कंपनी लवकरच सुरु होणार आहे. त्यासाठी पुर्वतयारी करण्यात येत आहे. याबरोबरच विविध मोबाईल कंपन्यांचे कॉलसेंटरही याठिकाणी सुरु होणार आहेत. यामध्ये सुमारे 4 हजार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे. आयटीपार्कमध्ये काम करणार्‍या युवक- युवतींना नगर शहरातून जाण्या-येण्याची सोय व्हावी यासाठी कॅब सेवाही सुरु केली जाणार आहे. आयटी पार्क सुरु झाल्यामुळे नगरमधील जे युवक-युवती पुणे-मुंबई सारख्या शहरात कार्यरत होते ते पुणे-मुंबई सोडून पुन्हा नगरकडे परतू लागले आहेत. ही या आयटीपार्कची मोठी उपलब्धी 

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post