धक्कादायक : जगातील पहिल्या ३०० विद्यापीठात एकही भारतीय नाही
माय नगर वेब टीम
नवी दिल्ली वृत्तसंस्था - भारतीय शिक्षणप्रणाली अव्वल असून आजवर अनेक दिग्गज इथून निर्माण झाले आहेत. मात्र, गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच विद्यापीठांच्या क्रमवारीत भारताच्या एकही विद्यापीठाचे नाव आलेले नाही. नुकतीच टाइम्स हायर एज्युकेशनने नुकतीच २०२० मध्ये जगातील अव्वल संस्थांची यादी जाहीर केली.
२०१२ नंतर पहिल्यांदाच पहिल्या ३०० विद्यापीठांत एकही भारतीय विद्यापीठ नाही. बंगळुरुमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) मध्ये गेल्या वर्षी अव्वल 300 मध्ये भारतीय प्रवेश मिळाला होता. तथापि, या अहवालात “संशोधन पर्यावरण, अध्यापनाचे वातावरण आणि उद्योगांच्या उत्पन्नात सुधारणा झाल्याने” त्याच्या उद्धरण प्रभावातील गुणांच्या तुलनेत भारतीय विद्यापीठ आपले स्थान गमावून बसले आहेत.
गेल्या काही दिवसांत भारतीय विद्यापीठांमध्ये गुणवत्ता घसरली आहे. भारतीय विद्यापीठांत दुसऱ्या स्थानी आयआयटी इंदोर आहे. तर तिसऱ्या स्थानी IIT- बॉम्बे भारत आहे. ते जागतिक क्रमवारीत 351-400 नंबरवर आहे.
यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड पुन्हा अव्वल
यूनिवर्सिटी ऑफ ऑक्सफोर्डने गेल्या चार वर्षांत जागतिक क्रमवारी शाबूत ठेवली आहे. यावर्षीही पुन्हा एकदा ऑक्सफोर्ड विद्यापीठाने क्रमांत एकजी जागा पक्की केली आहे.
१३०० विद्यापीठांनी घेतला होता जागतिक क्रमवारीत सहभाग
यावर्षी जागतिक क्रमवारीसाठी ९२ देशांच्या एकूण १३०० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. शैक्षणिक संस्थांच्या गुणवत्तेच्या दर्जानुसार जागतिक क्रमवारीची निश्चिती केली जाते.
Post a Comment