शरद पवारांचा ईडीकडे जाण्याचा निर्णय रद्द





माय नगर वेब टीम


  • मुंबई - राज्य सहकारी गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयानं नोटीस धाडल्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार चौकशीसाठी न बोलावताच ईडी कार्यालयात धडकणार होते.  दुपारी १.३० वाजता शरद पवार ईडी कार्यालयाकडे निघणार होते. परंतु, याआधी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर शरद पवारांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी, आपल्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप पवारांनी केलाच परंतु, आज ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचं पवारांनी म्हटलंय. यावेळी पवारांसोबत धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील या राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते.


तूर्तास कोणत्याही चौकशीची सध्या गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवण्यात आला होता. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली. तसंच यानंतर आपण पुण्यात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post