सुपा एमआयडीसीतील 'त्या' भूधारकांना १५ टक्के औद्योगीक भूखंडाचे वाटप



माय नगर वेब टीम

पारनेर - तालुक्यातील सुप्याजवळील नव्याने विकसित होत असलेल्या म्हसणे फाटा औद्योगीक वसाहतीसाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात आलेल्या क्षेत्रापैकी १५ टक्कभूखंडाचा परतावा देण्यात आला आहे.

एकूण संपादित करण्यात आलेल्या ५७२ हेक्टर ७१ आर क्षेत्रापैकी १५ टक्के म्हणजेच ८५ हेक्टर ९७ आर भूखंडाचे भूधारकांना वाटप करण्यात आले. यामध्ये वाघुंडे बुद्रुक येथील २०४ हेक्टर ८४ आर पैकी ३० हेक्टर ७२ आर, पळवे खुर्द येथील २३६ हेक्टर ७४ आर पैकी ३५ हेक्टर ५१आर, आपधूप येथील १३० हेक्टर ३९ आर क्षेत्रापैकी १९ हेक्टर ६३ आर तर म्हसणे येथील ७५ आर क्षेत्रापैकी ११ आर क्षेत्र परतावा म्हणून देण्यात आले. प्राप्त झालेल्या एकूण ६०० अर्जापैकी ४०० भूधारकांना त्यांच्या गावामध्ये जाऊन भूखंडाचे देकारपत्र देण्याची कार्यवाही नाशिक प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांनी केली. पत्र हाती पडल्याने शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले.

यामध्ये आपधूप येथील उत्तमराव गवळी, संगीता सोनवणे, पांडुरंग गवळी व इतर वाघुंडे येथील श्रीमंत बाबू शितोळे, अंजली हिरामण सुपेकर, चंद्रकला बाबासाहेब साठे व इतर, तर पळवे येथील रतन भाऊसाहेब बोरुडे, साहेबराव काशिनाथ पाचर्णे, कांताबाई लहानू डोईफोडे व इतर आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे.

ज्या भूधारकांची जामिन संपादनामध्ये गेली आहे, अशा सर्व भूधारकांना १५ टक्के औद्योगीक भूखंडाचा परतावा क्षेत्र भूसंपादनाच्या दराने म्हणजेच २० लाख रुपये दराने ऑफर लेटर देण्याची कार्यवाही प्रथमच एवढया मोठया प्रमाणात महाराष्ट्रात व अहमदनगर जिल्हयातील सुपा औद्योगीक वसाहतीत नाशिक प्रादेशिक अधिकारी यांचे मार्फत करण्यात आली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post