कर्तव्यदक्ष अधिकारी बचाव समितीचे महापालिकेसमोर धरणे ; केला निषेध
माय नगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांना पुर्वपदावर रुजू करुन कामाचा चार्ज त्यांच्याकडे सोपविण्यासाठी महापालिकेच्या विशेष सभेत क्रीडा विषयक धोरणाचा विषय अजेंड्यावर घेऊन नागरिकांचे म्हणणे शासनास पाठविण्याची मागणी डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ कर्तव्यदक्ष अधिकारी बचाव समितीच्या वतीने महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात बचाव समितीचे भैरवनाथ वाकळे, हरजितसिंह वधवा, सुहास मुळे, संध्या मेढे, इंजी. अभिजीत वाघ, आसिफ दुल्हेखान, विजय केदारे, यशवंत तोडमल, हरीभाऊ डोळसे, विकास गेरंगे, राजेश सटाणकर, संतोष गायकवाड, भैरवनाथ खंडागळे, दिपक शिरसाठ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कविता निंबाळकर-नावंदे यांना पुर्वपदावर रुजू करुन कामाचा चार्ज त्यांच्याकडे सोपविण्याची शहरातील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. यासाठी मनपाचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे, मुदस्सर शेख, सोनालीताई चितळे, मीनाताई चोपडा, विनीत पाऊलबुद्धे, रूपाली वारे, आसिफ सुलतान यांनी या संदर्भात विशेष सभेमध्ये नागरिकांचे म्हणणे ठराव घेऊन शासनास पाठविण्याचे पत्र मनपा प्रशासनाला दिले होते. मात्र या जिव्हाळ्याचा प्रश्नाला बगल देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांचा व नगरसेवकांच्या पत्राचा मनपा प्रशासनाने अनादर केल्याचा निषेध कर्तव्यदक्ष अधिकारी बचाव समितीच्या वतीने नोंदविण्यात आला आहे.
Post a Comment