अन् तब्बल १८ वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी
माय नगर वेब टीम
अहमदनगर - शाळा कॉलेजचे दिवस संपले की प्रत्येकजण आपापल्या करिअरस ठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो मात्र त्या शाळेमध्ये ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, लहानाचे मोठे झालो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर मैत्रीचे नाते जोडले ती नाळ मात्र तशीच असते. त्यामुळे सर्वांना एकदा भेटावे एकमेकांशी हितगुज करावी आणि शाळेच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी शाळेला मदत करावी यासाठी सारोळा कासार (ता.नगर) येथील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल १८ वर्षांनी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत जुन्या . आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेच्या ऋणातुन उतराई होण्यासाठी शाळेला आर्थिक मदतही केली.
सारोळा कासार येथे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय आहे. या विद्यालयातील सन २००१ ते २००३ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी यावर्षी कर्मवीर जयंतीचे औचित्य साधुन पुन्हा एकत्र येण्याचे ठरविले. त्यासाठी माजी विद्यार्थी व उद्योजक असलेले बाळासाहेब पठारे, खंडेराव कवडे, महेश रोडे, सोमनाथ झेंडे, शुभांगी धामणे-मांडगे, संगिता झरेकर-औटी यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातील विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संपर्क साधुन त्यांना स्नेहमेळाव्यास निमंत्रीत केले.
या मेळाव्यास विद्यालयाचे प्राचार्य एस.एस. शिंदे, पर्यवेक्षक भास्करराव कोकाटे, प्रा.रावसाहेब पठारे, पी.एन.तांबे, लतीफ शेख, प्रा.सुखदेव मुरुमकर यांनाही निमंत्रीत करत त्यांचा सन्मान केला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत जमा करत सुमारे ३१ हजार रुपयांचा निधी शाळेसाठी दिला. या मेळाव्याच्या निमित्ताने सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शाळेनंतर जीवनात झालेल्या स्थित्यंतराची माहिती एकमेकांना सांगितली. शाळेमध्ये जे ऋणानुबंध निर्माण झाले होते ते यापुढील काळातही तसेच कायम ठेवण्याचा, भविष्यात आपल्या वर्गमित्रांना अडी-अडचणी आल्यास मदतीचा आणि सामाजिक उपक्रमात सहभाग घेण्याचा संकल्प सर्वांना केला. यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंदही लुटला.
Post a Comment