पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा बँक सरसावली ; दिले 25 लाख



माय नगर वेब टीम

अहमदनगर - राज्यात झालेल्या अतिवृष्टी, पूरपरिस्थिती मुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत, त्यातच अहमदनगर जिल्हा बँकेने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्यामध्ये ऑगस्ट महीन्यात झालेल्या काही भागात अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व कर्मचारी यांच्या कडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे देतेवेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड, आ.वैभव पिचड, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील, पालक मंत्री ना.राम शिंदे, आ.स्नेहलता कोल्हे , आ.मोनिकाताई राजळे, बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post