माय नगर वेब टीम
अहमदनगर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला शुक्रवारी नगरमधून सुरू झाली. त्याचदरम्यान एका तरुणीचा उद्रेक झाला. तिने ‘सीएम गो बॅक’च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकल्याचा दावा केला आहे. शर्मिला येवले असे या तरुणीचे नाव असून ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याचे समजते.
सरकारचं महापोर्टल बंद करावं, पिचडांना उमेदवारी देऊ नये,
राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, ही मागणी करत अकोले येथे शर्मिली येवले या तरुणीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांचा मुख्य ताफा येण्याच्या अगोदर पुढे असलेल्या वाहनावर तिने निळी शाई फेकण्याचा प्रयत्न केला. ताफा निघून गेल्यानंतर पाच मिनिटांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अकोले येथे सभेच्या ठिकाणी दाखल झाला. पोलिसांनी अद्याप संबंधित तरुणीवर कोणतीही कारवाई केली नाही. तिने फेकलेली शाई रोडवर पडलेली दिसत होती. तिच्या मागण्या रास्त असतील, मात्र पद्धत चुकीची वाटते.तिचा अपघात होऊ शकला असता, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या नाशिक येथे 19 सप्टेंबरला समारोप होणार आहे. समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. महाजनादेश यात्रेत महाजनादेश सहभागी होणार असून ते नाशिक येथे होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे.
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या नाशिक येथे 19 सप्टेंबरला समारोप होणार आहे. समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. महाजनादेश यात्रेत महाजनादेश सहभागी होणार असून ते नाशिक येथे होणाऱ्या सभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून यात्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे.
आता विरोधकांना 25 वर्ष सत्ता मिळणार नाही : मुख्यमंत्री
‘मागील सत्ताकाळात लोकांशी नीट वागत नसलेल्या विरोधकांना गेल्या निवडणुकीत धडा मिळाला आहे. आणखी पंचवीस वर्षे त्यांना सत्ता मिळणार नाही. या काळात त्यांनी जनतेशी नीट वागायला शिकावे, तरच त्यांना किमान विरोधीपक्ष नेते पद मिळू शकते,’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज नगर जिल्ह्यातून सुरुवात झाली. त्यामध्ये अकोले व संगमनेर येथे आतापर्यंत त्यांच्या सभा झाल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सरकारची कामे सांगितली व विरोधकांवरही टोलेबाजी केली.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता विरोधी पक्षांत राहण्याची प्रॅक्टिस करावी. पुढील दहा पंधरा वर्षे लोकांत नीट राहिले तर विरोधी पक्ष नेता होण्याइतपत त्यांचे सदस्य निवडून येतील. लोकांशी नीट न वागल्याने विरोधक हरलेत पण ते इव्हीएमवर आरोप करतात, त्यांना इव्हीएमने नव्हे लोकांनी पराभूत केले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने केवळ स्वप्न दाखविली, आमच्या सरकारने त्या योजना मार्गी लावल्या. आता विरोधकांना निवडणुकीसाठी उमेदवार मिळणे दुरापास्त झाले आहे. गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने राज्याला प्रगतीपथावर नेले आहे. आम्ही सर्वच पातळ्यांवर काम करू शकलो नाहीत, ज्या गोष्टी राहिल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला पुन्हा सत्ता द्या.’
Post a Comment