उदयनराजेंचा दिल्लीत भाजपप्रवेश, मोदी-शाह-गडकरींची उपस्थिती, राजेंची ट्विटरद्वारे माहिती



माय नगर वेब टीम
सातारा - साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावरुन गेले काही दिवस राज्यात तसेच दिल्लीतील भाजपमध्ये खलबतं सुरु होती. उदयनराजेंना भाजप पक्षश्रेष्ठी पक्षात घेऊ इच्छित नसल्याची चर्चादेखील रंगली. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. उदयनराजे उद्या (14 सप्टेंबर) नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः उदयनराजेंनी ट्विटरद्वारे दिली आहे.

उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते व हवाई वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र पदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षप्रवेश करणार आहेत.

उदयनराजेंनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.

शरद पवारांचा आशिर्वाद घेऊनच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले भाजपमध्ये येतील. परवा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला होता, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते यावेत असं मला वाटतं. त्यांनी यावं अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post