धक्कादायक : बापाने केला मुलीसोबत नालायकपणाचा कळस!



माय नगर वेब टीम
अहमदनगर - बारा वर्षाच्या मुलीसोबत अश्‍लील चाळे करणार्‍या पित्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीनेच पतीविरोधात पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

जामखेड रस्त्यावरील वैद्य कॉलनीत रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी भिंगार पोलिसात विकृत पित्याविरोधात 354(अ),सह बालकांचे लैंगिक अपरथाचे संरक्षण अधिनियम 2012 चे क 8,9(छ)/10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्य कॉलनीतील या दाम्पत्याला एक मुलगा व मुलगी असे दोन अपत्य आहेत. रविवारी रात्री हा विकृत पिता घरी आला. अंगावरील शर्ट काढून त्याने मुलगा आणि मुलगी दोघांनाही मारहाण केली. त्यानंतर त्याने मुलीला उचलून दुसर्‍या खोलीत नेले. तेथे तिच्याशी अश्‍लील चाळे करत नको त्या ठिकाणी हात लावला. जवळ ओढून तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद पत्नीने पतीविरोधात दिली आहे. भिंगार पोलिसांनी त्या विकृत पित्याविरोधात गुन्हा दाखल केला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post