आम्ही जम्मू-काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार





माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. काल (5 ऑगस्ट) राज्यसभेत कलम 370 संदर्भातील विधेयक बहुमताने मंजूर झालं. आज लोकसभेतील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी पाकव्याप्त काश्मीर भारताचं अविभाज्य अंग असून त्यासाठी आम्ही जीव द्यायलाही तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अमित शाह लोकसभेत बोलत असताना काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर अमित शाह यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं. मी ज्यावेळी जम्मू काश्मीरबाबत बोलेतोय, त्यावेळी त्यात पाकव्याप्त काश्मीरचाही समावेश आहे. आम्ही जम्मू काश्मीरसाठी जीव द्यायलाही तयार आहोत, असं अमित शाह यांनी म्हटलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post