
माय नगर वेब टीम
श्रीरामपूर - शहरातील वॉर्ड नं 7 मधील थत्ते मैदान परिसरातून चलनातून बाद झालेले सुमारे 19 लाख 36 हजार रुपयांच्या जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा श्रीरामपूर शहर पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना थत्ते मैदान परिसरात एक इसम चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावला. त्यावेळी त्यांना एक इसम हातात कापडी पिशवी घेऊन थत्ते मैदानाकडे येत असताना दिसला. पोलिसांना त्याचा संशय आल्याने त्याला थांबण्यास सांगितले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची पहाणी केली असता त्यामध्ये चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या सुमारे 19 लाख 36 हजार रुपयांच्या नोटा मिळून आल्या. पोलिसांनी त्या नोटा जप्त केल्या आहेत.
Post a Comment