कर्नाटकमध्ये लालसेचा विजय





माय नगर वेब
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल करताना म्हटलं की, कर्नाटकमध्ये लालसेचा विजय झाला. दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देताना भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून स्वार्थी हेतूसाठी बाहेरुन आणि आतून निशाण्यावर होतं. जे लोक या आघाडीच्या सत्तेला एक धोका आणि अडथळ्याच्या रुपात पाहत होते, त्यांच्या लालसेचा आज विजय झाला. हा लोकशाही, प्रामाणिकपणा आणि कर्नाटकच्या जनतेचा पराभव आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post