बाजार समिती कर्मचार्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे ; समिती कर्मचारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत ठराव मंजूर
माय नगर वेब टीम
अहमदनगर- बाजार समिती कर्मचार्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे असा ठराव अहमदनगर जिल्हा बाजार समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे.
पतसंस्थेचे चेअरमन देवदत्त पालवे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची वार्षिक सभा पार पडली. या सभेला बाजार समिती चेअरमन विलास शिंदे, राज्याचे अध्यक्ष दिलीप डेबरे, रेवणनाथ चोभे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सभेला संचालक विष्णू पवार, मनोज कोतकर, सुभाष गव्हाणे, दादासाहेब म्हस्के, संजय काळे, संजय सरोदे, राजेंद्र राजपुरे, अरुण ढवळे, संजय मेहता, आबासाहेब घालमे, हौसाबाई गायकवाड, उषाताई हारदे आदी उपस्थित होते.
या सभेत गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर्मचार्यांच्या पाल्यांच्या शिक्षण आरोग्यासाठी संस्थेतर्फे कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
संस्था यावर्षी नफ्यात राहिलेली असून नफ्याचे वाटप सभासदांना लाभांशाच्या रुपाने दरवर्षी देत असते. त्याचप्रमाणे सभासदांना त्यांच्या ठेवीवर 11 टक्के प्रमाणे व्याजही देते. बाजार समितीचा सेवक कायम झालेल्या व सहकार खात्याची मान्यता असणार्या कर्मचार्यांना सभासद करून घेण्यात येते.
संस्थेने पोटनियम दुरूस्त करुन सभासद कर्जमर्यादा वाढविली आहे. त्याचा लाभ सभासद घेत आहेत. संस्थेने सर्व सभासदांना अपघाती विमा उतरविलेला आहे. संस्थेने सन 2018-19 च्या मिळविलेल्या नफ्यातून सभासदांना शे.12 टक्के लाभांश व सभासद ठेवीवर शे.11 टक्के व्याज वाटप करणार आहे. संस्थेचा दैनंदिन कारभार अतिशय काटकसरीचा असून अवांतर व अनावश्यक खर्च नाही.संस्थेच्या दरमहाच्या ताळेबंदाशी बँक कर्ज बाकी, सभासद कर्ज, मे.शेअर्स व मे.ठेवीच्या बाक्या या सतत जुळणार्या आहेत. शासकीय कर्ज वाटप प्रणालीनुसार सभासद कर्जवाटप नेहमी कर्जवाटप मर्यादेच्या आतच असते.
संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेस सतत ऑडीट वर्ग अ प्राप्त झालेले आहेत. संस्थेच्या आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीत सर्व सामील बाजार समित्यांचे मोलाचे योगदान असून कर्जवाटप व वसुलीमध्ये नगर कृषि उत्पन्न बाजार समिती, नगर यांचा सिंहाचा वाटा आहे. संस्थेची आर्थिक प्रकृती सदृढ आहे. ना परतीच्या ठेव खात्यात रु.1 कोटी 48 लाख गुंतवणुक असून मे.कर्ज व मेंबर येणे व्याज रु. 22 लाख 47 हजार आहे. मे.शेअर्स रु. 1 कोटी 33 लाख असून बँक कॅश क्रेडीट देणे रु.1.44 लाख आहे. मे. ठेवी रु. 3 कोटी 03 लाखाच्या आत असून यामध्ये सतत वाढ होत आहे.
संस्थेने वाटलेल्या कर्जात प्रती 72.00 संस्थेचा हिस्सा असून बाहेरील कर्जाचा हिस्सा रु. 28.00 आहे. संस्थेस जिल्हा सहकारी बँकेकडून कॅश क्रेडीट कर्जावर शे.11.85 टक्के व्याज आकारते. संस्था मात्र सभासद कर्जावर शे.13 टक्के व्याज आकारते. तफावत फक्त रु.1.15 टक्के शेकडा आहे. संस्थेचा व्यवस्थापन खर्च अत्यल्प असल्यामुळेच हे शक्य आहे. वास्तविक यामध्ये शे.3 टक्के पर्यंत तफावत असल्याची मुभा आहे. त्याचप्रमाणे संस्था सभासदांना त्यांच्या ठेवीवर शे.11 टक्के व्याज देते. इतर ठिकाणी ठेव व्याजदर कमी आहे. नफा कमविण्याचा उद्देश नसल्याने व्यवस्थापक समितीने सभासद ठेवींवर 11 टक्के व्याज देण्याचा ठराव मंजूर केलेला आहे.
Post a Comment