गॅस योजनेच्या माध्यमातून मतदारसंघ धुरमुक्त करणार- आ. शिवाजी कर्डिले


माय नगर वेब टीम

अहमदनगर - भाजप सरकारच्या काळात योजनामध्ये पारदर्शिकपणा आल्यामुळे सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाला भाजप सरकारने दिलासा देण्याचे काम केले आहे. सरकारच्या योजना कागदावरच न राहता या सरकारने प्रत्यक्षात अंमलात आणल्या आहेत. तरी जनतेने सरकारच्या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले. राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्र चुलमुक्त व धुरमूक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. त्याच धर्तीवर नगर- राहुरी मतदार संघही चुलमुक्त व धुरमुक्त करणार असल्याचे ते म्हणाले.

नगर तालुक्यातील कापुरवाडी येथे वनविभागाच्या वतीने गॅस वितरण योजनेचा शुभारंभ आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, संचालक संदीप कर्डिले, राम पानमळकर, शंकर पवार, कानिफनाथ कासार, संभाजी भगत, बलभिम भगत, सुनिता भिंगारदिवे, कासम शेख, मारुती कचरे, बाळासाहेब कर्डिले, सचिन तोडमल, सदाशिव धामणे, संपत धाडगे, मुन्ना शेख, मंदाताई भिंगारदिवे आदी उपस्थित होते.

यावेळी आ.शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, गॅस योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. योजना मिळेपर्यंत तिचा उपयोग न करता गॅसचा उपयोग दररोज करावा, त्यामुळे वृक्षाची तोड होणार नाही. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा र्‍हास मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे महाराष्ट्राला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यासाठी वृक्षतोड न करता वृक्षारोपण व त्याचे संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे. चुलीमुळे महिलांच्या डोळ्याच्या आरोग्याबाबत प्रश्न निर्माण होतो. यासाठी वनविभागाच्यावतीने राबवित असलेल्या गॅस योजनेचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बाजार समितीचे सभापती विलास शिंदे म्हणाले,आ.शिवाजीराव कर्डिले यांनी शासनाच्या योजना सर्वसामान्य लोकापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. सरकार हे समाजाचे आधारस्तंभ असते. लोकप्रतिनिधी हे सरकार आणि जनतेमधील दुवा आहे आणि ती भुमिका आ.शिवाजीराव कर्डिले यांनी पार पाडली आहे असे ते म्हणाले.

यावेळी संभाजी भगत म्हणाले की, आम्हाला न मागता सर्व विकासकामे मिळत असतात. आ.कर्डिले हे विकासकामांचे दुत आहेत. गावामधील 60 कुटुंबाला वनविभागाच्यावतीने देण्यात आले. गॅस आता आम्ही सर्व गावकरी आता यापुढे वृक्षतोड न करता वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post