चतुर्थीच्या दिवशी 'नॉनव्हेज’न बनविल्याच्या रागातून पत्नीस मारहाण!




माय नगर वेब टीम
अहमदनगर – घरात नॉन व्हेज का बनविले नाही असे म्हणत पतीने मारहाण केल्याची तक्रार पत्नीने पोलिसात दाखल केली आहे. सावेडीतील गुलमोहर रस्त्यावरील पोलीस चौकीसमोेर ही घटना घडली.

पत्नीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी बाळासाहेब महादेव लोखंडे (साईकुंज अपार्टमेंट, गुलमोहर रस्ता) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

कर्जत तालुक्यातील लिंबगाववाडी येथील रहिवासी असलेले लोखंडे कुटुंब सध्या नगरमध्ये वास्तव्यास आहे. बाळासाहेब याने पत्नी अनिताला शनिवारी नॉनव्हेज बनवण्यास सांगितले.

मात्र, त्या दिवशी संकष्ट चतुर्थी असल्याने अनिताने नॉनव्हेज बनवले नाही. त्याचा राग आल्याने बाळासाहेबने तिला मारहाण केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post