'विखे-पाटील कुटुंब सत्तेशिवाय राहू शकत नाही'



माय नगर वेब टीम

मुंबई

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. जिथे सत्ता असेल तिथे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कुटुंब असतेच कारण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत असा आरोप मलिक यांनी केला आहे. माध्यमांशी ते बोलत होते. विरोधीपक्ष नेते व काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. या अगोदरच त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला.

विखे पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे तर भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना मंत्रीपदही दिले जाणार असल्याचे म्हंटले जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post