काकासाहेब म्हस्के फाउंडेशनच्या ओम साई कोकण सृष्टी अँड ऍग्रो टुरिझम प्रकल्पाचे रविवारी उदघाटन
माय नगर वेब टीम
अहमदनगर
काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन द्वारा ओम साई कोकण सृष्टी अँड ऍग्रो टुरिझम हा नवीन प्रकल्प येत्या रविवारी दिनांक 16 जून रोजी सुरू करण्यात येणार असून मार्ट या नामांकित संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांच्या हस्ते या
प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. मुळा टॅग परिसरातील जांभूळबन येथे विस्तीर्ण
परिसरात हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती या
कार्यक्रमास लाभणार असल्याचे प्रकल्प संचालक डॉ. सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नगर जिल्ह्यातील पर्यटन प्रेमींना एक हक्काचं ठिकाण उपलब्ध व्हावं तसेच ऍग्रो टुरिझम या क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. मुळा डॅमच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटकांना आपले निसटलेले क्षण व हरवलेली शांतता उपलब्ध
करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटक प्रेमींना निसर्गाच्या
सानिध्यात आपला वेळ घालवण्याची संधी मिळणार असून या प्रकल्पांतर्गत व्हेज रेस्टॉरंट, योगा-मेडिटेशनची सेवा, वॉटर स्पोर्ट, घोडेस्वारी, पॅराग्लायडिंग, इंडोर गेम्स तसेच
आउटडोर गेम्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बोटिंग, बैलगाडी स्वारी, ट्रॅक्टर
स्वारी स्कुबा डायविंग आदी नावीन्यपूर्ण संकल्पना ही राबवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. रविवार दिनांक 16 जून रोजी दुपारी दोन ते चार मार्टच्या माध्यमातून कृषी पर्यटन
परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी चारच्या सुमारास उद्घाटनाचा कार्यक्रम
संपन्न होणार असून त्यानंतर पक्षांना काय हवे या विषयावर प्राध्यापक सुधाकर कु-हाडे
मार्गदर्शन करतील. त्यानंतर सायंकाळी पाच ते सातच्या सुमारास सप्तसूर फाउंडेशनच्यावतीने ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. या उद्घाटन कार्यक्रमास
उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Post a Comment