कॉंग्रेस सत्तेत आल्यास मोदी, अंबानी तुरुंगात :पृथ्वीराज चव्हाण



वेब न्यूज
राफेल विमान सौदा प्रकरणाची एनडीएच्या नेतृत्वाखाली सरकारने चुकीची आणि अपूर्ण माहिती दिली आणि सर्वोच्च न्यायालयाचा भ्रमनिरास केला. आता सर्वोच्च न्यायालयाने अरुण शौरी यांच्याद्वारे दाखल केलेल्या पुनरावलोकनाची याचिका स्वीकारली आणि न्यायालयाने हिंदू वृत्तपत्रांत प्रकाशित केलेल्या पुराव्याप्रमाणेच चोरी झालेले कागदपत्र स्वीकारले आहे. राफेल कराराची सुनावणी सुरु केली. कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनिल अंबानी आणि या करारात सहभागी असलेले नोकरशहा राफेल विमान घोटाळ्याच्या व्यवहाराच्या संदर्भात तुरुंगात असू शकतात, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स अटलांटिका फ्लॅग या फ्रान्सस्थित कंपनीला सुमारे १२०० कोटी रूपयांचा कर भरणा करण्यास तेथील कर विभागाने सांगितले. हा कर भरणा २०१२ ते २०१५ पर्यंतचा होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारा दरम्यान अनिल अंबानी यांच्या कंपनीला ऑफसेट कंत्राट मिळवून दिले. त्यानंतर फ्रान्स सरकारच्या कर विभागाने कर माफी करत कराची रक्कम ११०० कोटीने कमी केली, असा गौप्यस्फोट एका राष्ट्रीय फ्रेंच दैनिक ‘ले मॉंड’ने केल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. त्याचवेळी सर्व घोटाळेबाज तुरुंगात असतील, असे चव्हाण म्हणाले.
देशातील जनता एनडीए सरकारला कंटाळली आहे. जे शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यात, जीएसटी अंमलबजावणी, नोटाबंदी, बेरोजगारी यासारख्या सर्व आघाड्यांवर अयशस्वी झाले. मागील निवडणुकीत दिले गेलेले बहुतेक शब्द पूर्ण करण्यात ते अयशस्वी ठरले, असा आरोप त्यांनी केला. प्रचार मोहिमेदरम्यान नरेंद्र मोदी ‘सबका साथ सबका विकास’ विसरले असून आमच्या भारतीय जवानांच्या नावावर मत मागत आहेत, हेे चुकीचे आहे. या संदर्भात रिटायर्ड आर्मी ऑफिसरच्या तक्रारी राष्ट्रपतींकडे पोहोचल्या आहेत, असा दावा त्यांनी केला.
राज्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मोठ्या प्रमाणात भाजपत सामिल होत आहेत. त्या नेत्यांविषयी बोलताना जे लोक भाजपमध्ये सामील होत आहेत, त्यांना सरकारकडून कारवाईची भीती आहे. ही नेते मंडळी सहकार क्षेत्राच्या पट्‌ट्यातील असून भाजप ‘साम, दाम, दंड, भेद’चा मार्ग अवलंबत त्यांना अडकवत आहे, असा आरोप त्यांनी केला. तुमची कुंडली आमच्याकडे आहे, असे सांगत ब्लॅकमेलिंग करत आहे. सरकारकडे काहीच पुरावे नाहीत. मात्र तुम्ही कर्ज वगैरे घेतली असली तर मिटवावी, असा सल्ला मी देतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post