पैलवान नरसिंग यादव महाराष्ट्र पोलीस दलातून निलंबित




मुंबई : 
काँग्रेसचे मुंबई उत्तर -पश्चिममधील उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचारसभेत सहभागी होणं पैलवान नरसिंग यादवला चांगलंच महागात पडलं आहे. कारण निरुपम यांच्या प्रचारसभेत सहभागी झाल्याले त्याला महाराष्ट्र पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे.

नरसिंग यादव हा मुंबईत सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत आहे. मात्र त्यानं काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांच्या प्रचारसभेत हजेरी लावली. सरकारी पदावर असताना राजकीय प्रचार केल्याप्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी अंधेरील अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरसिंग यादवविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post