लक्झरी बस व ट्रक च्या अपघातात 17 जखमी, चौघांची प्रकृती चिंताजनक
नान्नज (वार्ताहर)
जामखेड-खर्डा रोडवर रविवार रोजी पहाटे रस्ता विचारण्यासाठी रोडवर थांबलेल्या लक्झरी बसला पाठीमागून आलेल्या ट्रकची जोरदार धडक बसुन लक्झरी बस मधील 16 जण जखमी झाले तर ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला असल्याने या अपघातात एकूण 17 जण गंभीर जखमी झाले असून यामधील चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
यामधील जखमींची नावे पुढीलप्रमाणे सुनंदा देवीदास सातवकर पार्डी चुरमुरा ता. उमरखेड ,सुकेशणा गौतम मुनेश्वर (उमरखेड) , कुणाल विकास मुनेश्वर ( दहागाव) लक्ष्मी विठ्ठल मुन्वर (शवालपिंपरी) , राधाबाई वसंत सावतकर (पार्डी चुरमुरा) ,स्नेहल संदीप सिंगंनकर , ( उमरखेड,) शारदा सुभाष शिंगनकर ( उमरखेड) , केरबा पुंडलीक मुनेश्वर (उमरखेड) ,राजू देवानंद जाधव ( दहागाव) ,कमलबाई किसन मुनेश्वर (दहागाव) अदित्य सुभाष सिंगनकर ( दहागाव ) उमेश रमेश वाघमारे (उमरखेड) ,संदिप दिलीप सावते ( उमरखेड) रामचंद्र देवानंद जाधव ( दहागाव,) राहुल यशवंत मुनेश्वर ( दहागाव) ट्रक चालक गफ्फार पठाण रा. येनकुर ता. भालकी जि. बिदर अशी सतरा जखमींची नावे आहेत.या अपघातात जखमी झालेल्या 17 रुग्णांना 108 रुग्णवाहिकेने तत्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. युवराज खराडे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले लक्झरी बस मधील तीन व ट्रक चालक अशा एकुण चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी या चौघांना तत्काळ हलविण्यात आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लक्झरी बस चालक रमेश दत्तराव जाधव (वय 49) रा. नागसवाडी ता. उमरखेड जि. यवतमाळ लक्झरी बस क्रमांक MH 01 LA 8097 लग्नाचे प्रवाशी भाडे दहागाव ता. उमरखेड जि. यवतमाळ येथून बदलापूर (मुंबई) येथे घेवून गेली. लग्नाचा कार्यक्रम आटपून पुन्हा बदलापूर (मुंबई) येथुन अहमदनगर मार्गे जामखेड येथून खर्डा रोडने बस घेवून जात असताना सोमवार रोजी पहाटे 4-30 वा. सुमारास आनंदवाडी गावात रस्ता चुकला असल्याने बस चालक रस्त्याचे बाजुस बस उभी करुन थांबला होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रक क्रमांक kA39-7741 चा चालक गफ्फार बाबुखान पठाण याने लक्झरी बसला पाठीमागून जोराची धडक दिल्याने बस मधील प्रवाशी जखमी केले.याबाबत लक्झरी चालक रमेश जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसात ट्रक चालक गफ्फार पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पोलीस हवालदार नवनाथ भिताडे है पुढील तपास करत आहेत.

Post a Comment