
राहुल गांधी यांच्या आज बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे प्रचार सभा होणार होत्या. समस्तीपूर येथील सभेसाठी राहुल हे विमानाने जात होते. सकाळी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानाच्या इंजिनात बिघाड झाला. विमानाच्या कॉकपीटमधील व्हिडिओ त्यांनी ट्विट करून तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. या उद्भवलेल्या समस्येमुळे संगमनेरसह बिहार आणि ओडिशातील सभा सुरू होण्यास विलंब होणार आहे, असे सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Post a Comment