जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांना वाचवणाऱ्या युवा सहकाऱ्यांचा खासदार निलेश लंके यांनी केला सत्कार
नुकसाग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची केली पाहणी... / पूरग्रस्त कुटूंबांना अन्नधान्य कीट भेट... / जनावरांना चाऱ्याचे केले वाटप..
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : सलग दहा, बारा दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नगर जिल्ह्यात मोेठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी यासाठी आज येथील खासदार निलेश लंके व पदाधिकारी, कार्यकत्यांनी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दरम्यान पूग्रस्त शेतकऱ्यांना अन्न धान्य कीट, जनावरांना चारा वाटप करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
या पाहणी दौऱ्यात खासदार लंके यांच्यासह जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, नगरसेवक योगीराज गाडे, तालुकाध्यक्ष राजू भगत, नितीन पवार, ग्रा. पं. सदस्य वसंत गारुड, अरुण जाधव, सचिन शिंदे, बहु गहिले, सुहास कासार, संदिप बोठे, दिलीप भालसिंग, सागर कासार, माऊली लंके यांचा समावेश होता. वाळकीतील गंगाराम जुंदरे व परसराम जुंदरे यांच्या २५ गाई व ४० शेळ्या वाहून गेल्या, येथील पुलही वाहून गेला. फळबागांसह चारा वाहून गेला. ही माहिती समजताच खासदार निलेश लंके यांनी स्वतः जुंदरे वस्तीवरील बंधाऱ्याचे दरवाजे उघडले व तातडीने चाऱ्याची व किराणा सामानाची व्यवस्था करून दिली.
खडकी येथील नंदू रोकडे यांच्या आठ जर्सी गाई व जनावरांचा संपूर्ण चारा वाहून गेला. त्यांच्या कुटुंिबयांनी गाईच्या गोठ्यावरील छतावर आधार घेतला. खडकी येथील दीपक सयाजी कोठुळे व संतोष सयाजी कोठुळे या बंधूंनी लाईटच्या खांबाचा आधार घेत जीव वाचवला. त्यांची कांदा चाळ, मुरघास, चारा उपयोगी वस्तू, विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य व कागदपत्रे सर्व वाहून गेले. खडकी येथे सरपंच प्रवीण कोठुळे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड, माजी सरपंच शरद कोठुळे, अमृता कोठुळे, अशोक कोठुळे, बापू कोठुळे, पंढरी नाना कोठुळे, विनोद सातार, नवनाथ गायकवाड, मंगेश शिंदे, विनोद निकम, ऋषी निकम, संदीप कोठुळे, दीपक कोठुळे, संजय पवार, सोमनाथ कोठुळे, सागर गायकवाड, केतन रोकडे, राहुल निकम, सयाजी रोकडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ज्योती दीपक कोठुळे, कल्याणी ज्ञानदेव कोठुळे, श्रद्धा संतोष कोठुळे यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर चढून स्वतःची वाचवला.
सारोळा येथे रस्ते उघडले असून स्मशानभूमी वाहून गेली आहे. याची पाहणी करताना राजाराम धामणे, गोरा भाऊ काळे, दूध संघ चेअरमन नामदेव काळे, गजानन पुंड, ग्रामपंचायत सदस्य रोहित काळे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लिंबोरे, अण्णा काळे, गोरख काळे, सुरेश धामणे, विलास धामणे, अमोल कडूस, सुरज कडूस, नारायण कडूस व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते.
आकोळनेर येथे तरवडी रोड, सारोळा मार्गे थोरात वस्ती, भोर वस्ती, फणसाचा मळा, जाधववाडी, मेहेत्रे मळा, भोरवाडी रोड वाहून गेला. अविनाश जाधव, अरुण जाधव, माजी उपसरपंच मच्छिंद्र जाधव, माजी सरपंच गंगाधर ठुबे, माजी सरपंच गारुडकर, भूषण शेळके, अजय कोळगे, सतीश गायकवाड, बाळासाहेब शेळके, प्रशांत बापू जाधव, दादा जाधव, सागर शेळके, भाऊसाहेब जाधव, संग्राम गायकवाड, अरुण जाधव, तात्या जाधव, दादा रोहकले, आदेश शेळके, गणेश कोळगे उपस्थित होते.
आकोळनेर येथे तरवडी रोड, सारोळा मार्गे थोरात वस्ती, भोर वस्ती, फणसाचा मळा, जाधववाडी, मेहेत्रे मळा, भोरवाडी रोड, रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत. गाव तळे पण वाहून गेले. अविनाश जाधव, अरुण जाधव, माजी उप सरपंच मच्छिंद्र जाधव, माजी सरपंच गंगाधर ठुबे, माजी सरपंच गारुडकर, भूषण शेळके, अजय कोळगे, सतीश गायकवाड, बाळासाहेब शेळके, प्रशांत जाधव, दादा जाधव, सागर शेळके, भाऊसाहेब जाधव, संग्राम गायकवाड, अरुण जाधव, तात्याभाऊ जाधव, दादा रोहकले, आदेश शेळके, गणेश कोळगे इत्यादी उपस्थित होते. या दौऱ्यामध्ये महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, कृषी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment