प्रतिभाताई पाचपुते यांचा नगर तालुक्यात झंझावात, विरोधकांकडे मुद्दे काय ? सौ. पाचपुते यांचा सवाल
माय नगर वेब टीम
गुंडेगाव - श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघात ज्या ज्या वेळी बहुरंगी लढत झाली त्या त्या वेळी पाचपुतेच निवडणूक आले आहेत. आता होत असलेल्या निवडणुकीमध्येही श्रीगोंदा-नगर मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे. त्यामुळे विक्रम पाचपुते यांचा विजय पक्का असल्याचे सांगत विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही. आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जात आहोत.नगर तालुक्यातील गुंडेगाव सह वाळकी गटातील अनेक गावांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना जशी साथ दिली तशीच साथ विक्रमला पाचपुते यांना साथ द्यावी, नगर तालुक्याच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असे मत प्रतिभाताई पाचपुते यांनी व्यक्त केले आहे.
माजी मंत्री बबनराव पाचपुते आमदार, मंत्री राहिले आहेत. त्यांनी श्रीगोंदा मतदारसंघाचा विकास केला. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सर्वाधिक निधी श्रीगोंदा-नगर मतदारसंघात आणला आहे. दादांनी विकासाचे व्हिजन घेऊन काम केले. परंतू, आता विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. केवळ पाचपुते परिवाराकडून होत असलेला मतदारसंघाचा विकास रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. परंतू, श्रीगोंद्यात आत्तापर्यंत झालेल्या बहुरंगी लढतीत पाचुतेच विजयी झाले आहेत हा आजपर्यंतचा इतिहास आहे. विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही. आपल्याकडे व्हिजन आहे.नगर तालुक्यातील गावांचा संपूर्ण अभ्यास केलाय. निधी कसा आणायचा हे माहित विक्रम पाचपुते यांना माहीती आहे. श्रीगोंदा -नगर मतदारसंघाची विकासासाकडे वाटचाल सुरु आहे. त्यात खंड पडू देऊ नका असे सांगत मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा व आपल्या विश्वासाला तडा जावू देणार नसल्याचे प्रतिभाताई पाचपुते यांनी सांगितले.
यावेळी माजी उपसरपंच संतोष भापकर, काकासाहेब माने, गणेश हराळ, सोपान भापकर, संदिप धावडे, झुंबरं भापकर, आबासाहेब भापकर, प्रदीप भापकर, संतोष कोतकर, राहुल राऊत, डॅनियल जावळे,मनोज धावडे, रावसाहेब चौधरी, प्रभाकर देशमुख सचिन हराळ, शैलेश पिंपरकर, अक्षय मुदगुले, मिराताई शिंदे,सुनीताताई खेतमाळी, बाळासाहेब महाडिक, लालासाहेब करपे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Post a Comment