पारनेरमध्ये अजितपवारांचा 'हा' पठ्ठा देणार लंकेंना टाईट फाईट

 


माय नगर वेब टीम 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची ४ उमेदवारांची तिसरी यादी रविवारी (दि.२७) दुपारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. फलटणमधून सचिन पाटील, गेवराईतून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिलील बनकर निफाड, काशिनाथ दाते पारनेरमधून उमेदवारी संधी मिळाली आहे. 

पारनेर मध्ये शरद पवार गटाची उमेदवारी खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना जाहीर झालेली आहे. तर अजितदादा गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी सभापती काशिनाथ दाते व पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी हे इच्छुक होते. तिघांपैकी कोण याचा निर्णय होत नव्हता त्यामुळे पारनेरच्या उमेदवाराची घोषणा लांबणीवर पडली होती. अखेर आज रविवारी याचा फैसला झाला असून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post