माय नगर वेब टीम
पारनेर : कान्हूर पठार ग्रामपंचायतमधील आझाद ठुबे गटाच्या सात सदस्यांनी मंगळवारी रात्री सुपे येथे खासदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात विनाअट प्रवेश केला. यापुढील काळात खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करून सर्व निवडणूका एकदिलाने लढविण्याचा शब्द या सदस्यांनी खा. लंके यांना दिला. लंके यांनी पक्षाचा पंचा गळयात घालू सर्वांचे स्वागत केले.
सन २०२३ मध्ये कान्हूरपठार ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणूक होऊन नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पंचरत्न जय जवान जय किसान पॅनलने सरपंच पदासह सहा जागा जिंकत ग्रामपंचायतीची सत्ता हस्तगत केली. या पॅनलच्या विजयाने आझाद ठुबे गटाची वर्षानुवर्षांची सत्ता संपुष्टात येउन गावात सत्तांतर झाले होते. लोकनियुक्त सरपंच म्हणून संध्या किरण ठुबे या विजयी झाल्यानंतर उपसरपंचपदावर नीलेश लंके यांचे खंदे समर्थक प्रसाद अशोक नवले यांची वर्णी लावण्यात आली. ग्रामपंचयतीची सत्ता आल्यानंतर खा. लंके यांनी पदाधिकाऱ्यांना बळ देत कोटयावधी रूपयांची कामे दिली. सत्ताधारी पदाधिकारी सक्षमपणे काम करत असल्याने लोकसभा निवडणूकीत कान्हूरपठार गावामध्ये खा. लंके यांना ५५१ मतांची आघाडी मिळाली होती.
खा. लंके यांच्या पाठीशी जनमताचा कौल असल्याने विरोधात असलेल्या आझाद ठुबे समर्थक सहा सदस्यांनीही खा. लंके यांना समर्थन देण्याचा निर्णय घेत पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणीताई नीलेश लंके यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात खा. लंके यांच्यासोबत काम करण्याचा तसेच सर्व निवडणूका एकदिलाने लढविण्याची ग्वाही यावेळी या सदस्यांनी दिली.
यावेळी मा. उपसरपंच सागर व्यवहारे, सचिन ठुबे, किशोर ठुबे, कैलास ठुबे, अमोल ठुबे, राजेंद्र भांबे, किरण शंकर ठुबे, अशोक ठुबे, युवराज ठुबे, प्रविण ठुबे, अंबादास ठुबे, अक्षय ठुबे हे उपस्थित होते.
या सदस्यांनी केला प्रवेश
विशाल शंकर लोंढे, ज्ञानेश्वर बापू ठुबे, सतिश विठ्ठल ठुबे, स्वप्नाली दीपक लोंढे, मंदा दत्तात्रय सोनावळे, शारदा वैभव साळवे.
हे आहेत लंके समर्थक
पदाधिकारी व सदस्य
संध्या किरण ठुबे लोकनियुक्त सरपंच, प्रसाद अशोक नवले उपसरपंच, सविता धनंजय ठुबे, सुनिता झानेश्वर गायखे, धनंजय वसंत व्यवहारे, श्रीकांत विठठल ठुबे, गंगुबाई एकनाथ तांबे.
पठार भागावर प्रभाव पडणार
पठार भागातील अनेक गावांचा कान्हूरपठारशी संपर्क असतो. पठार भागातील राजकारणावर कान्हूरच्या राजकारणाचा कायमच वरचष्मा राहिलेला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर ग्रामपंचायतमधील सत्ताधारी व विरोधी सदस्य खा. नीलेश लंके यांच्या पाठीशी उभे राहिल्याने या निर्णयाचा पठार भागातील राजकारणावर प्रभाव पडणार आहे.
सर्व सदस्यांना न्याय देणार
राजकारण हे निवडणूकीपुरतेच असते. निवडणूकीनंतर गावाचा विकास हेच ध्येय असते. त्यामुळे आपण विकास निधी देताना कधीही भेदभाव केला नाही. आता विरोधी गटाचे सहा सदस्य आमच्यासोबत आले असून त्यांना योग्य सन्मान देत न्याय देण्यात येईल.
खा. नीलेश लंके
लोकसभा सदस्य
Post a Comment