पारनेरकरांचं ठरलं! पुन्हा इतिहास घडणार; खासदार लंके यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश... नेमकं काय म्हणाले पहा....



पारनेरचा उमेदवार महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी विजयी होणार !

खासदार नीलेश लंके यांचा विश्‍वास / राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार 

माय नगर वेब टीम 

पारनेर :  आगामी विधानसभा निवडणूकीत पारनेर - नगर मतदार संघातील महाविकास आघाडीचा उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी होईल असा विश्‍वास खासदार नीलेश लंके यांनी व्यक्त केेला. 

      पारनेर-नगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच बुथ कमिटी सदस्यांची बैठक नगर- पुणे महामार्गावरील ग्रीन हेवन मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी लंके यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. लोकसभा निवडणूकीत परीश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा यावेळी मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. 

    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर,नीलेश लंके प्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष सुदाम पवार, सचिव भाऊसाहेब भोगाडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी,हंग्याचे सरपंच राजेंद्र शिंदे, राधाकृष्ण वाळूंज, मारूती रेपाळे,मल्हारी आव्हाड, किसनराव रासकर,जितेश सरडे,मोहन रोकडे आदी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना खा. लंंके म्हणाले, लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर झाल्यानंतर आतापर्यंत वेळ न मिळाल्याने या मेळाव्यास उशिर झाला. या निवडणूकीत जे यश मिळाले ते तुमच्या प्रामाणिक कामचे फळ आहे. मीच नीलेश लंके म्हणून प्रत्येकाने परीश्रम केल्याने मोठया शक्तीला आपण पराभूत करू शकलो. काही लोक आपणास तुमचे काम आहे का असे म्हणून हिणवत होते मात्र सामुहिक जबाबदारीमुळे हिनवणारांना मतपेटीतून आपण उत्तर देऊ शकल्याचे खा. लंके म्हणाले. 

      खा.लंके पुढे म्हणाले, विविध कार्यकर्त्यांवर तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली होती. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. पारनेर तालुक्यात आपण पाठीमागे आहोत असे विरोधकांनी चित्र रंगविले होते. मला केवळ दोन दिवस तालुक्यासाठी देता आले तरीही ३९ हजारांचे मताधिक्य मिळाले. हे प्रामाणिक कामाचे यश असल्याचे लंके यांनी सांगितले.  

    आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांच्या डोळयात आश्रू उभे राहिले. मात्र प्रत्येक जाण लोकसभा निवडणूकीत जीव ओतून काम करणार याची मला खात्री होती. ही निवडणूक तुमच्याच पाठबळावर आपण जिंकू असा विश्‍वास होता. महिला भगिनींनीही मतदारसंघात फिरून प्रचाराची धुरा सांभाळली.  

      महाविकास आघाडीचा उमेदवार एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाला पाहिजे अशी खुणगाठ प्रत्येकाने बांधावी. उमेदवारी देण्याचा अधिकार मला नाही. शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात हे उमेदवार देणार आहेत. तुमच्या भावना मी पक्षश्रेष्ठींसमोर मांडेल. या जिल्हयात प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडूण आणण्याची माझ्यावर जबाबदारी असल्याचे लंके यांनी सांगितले. 

   पारनेर तालुक्यात भावींची चर्चा सुरू आहे. ते भावीच राहणार आहेत. तुम्ही ज्यांच्या अंगावर गुलाल टाकाल तोच तालुक्याचा आमदार होणार आहे. लोकसभा जिंकली आता विधानसभाही आपणच जिंकणार आहोत असा ठाम विश्‍वास लंके यांनी व्यक्त केला. 

      पारनेर-नगर मतदारसंघातील ३६५ बुथपैकी केवळ २७ बुथवर आपणास कमी मतदान झाले असून या बुथवरही मतदान वाढविण्यासाठी नियोजन करण्याची जबाबदारी आपली असल्याचे लंके यांनी सांगितले.  

महिलांच्या नेतृत्वाला संधी द्या 

सज्जन व भक्कम कार्यकर्त्यांची फळी खा. लंके यांच्या पाठीशी आहे. याच फळीच्या जोरावर उत्तरेचे आक्रमण आपण परतवून लावले. कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण लोकसभेची निवडणूक जिंकलो. महिला भगीनींनीही या निवडणूकीत दमदार बॅटींग केली. विधानसभेलाही हीच टीम अग्रभागी असेल. लोकसभेची पेरणी राणीताई लंके यांनी तीन ते चार वर्षे केली. आता महिलांच्या नेतृत्वाला विधानसभेत पाठविण्याची जबाबदारी आपली आहे. 

सुवर्णा धाडगे

तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी महिला आघाडी

मताधिक्य देणाऱ्या गटाला 5 लाखांचे बक्षिस 

राणीताईंची उमेदवार निश्‍चित आहे. तर विरोधकांकडे भावींची मोठी गर्दी आहे. लोकसभा निवडणूकीत ज्या पध्दतीने आपण प्रचार केला त्याच पध्दतीने प्रचार करून राणीताई यांना विधानसभेत पाठवायचे आहे. जिल्हा परीषदेचा जो गट सर्वाधिक मताधिक्य देईल त्या गटाला पाच लाखांचे बक्षिस देण्यात येईल. खासदारकी, आमदारकी आपल्याकडेच असणार आहे. त्यामुळे निधीची कमतरता भासणार नाही. 

सुदाम पवार :  (प्रदेशाध्यक्ष नीलेश लंके प्रतिष्ठाण)

कार्यकर्त्यांच्या भावना श्रेष्ठींपर्यंत पोहचवू 

लोकसभा निवडणूकीत आपण इतिहास घडविला. मोठया शक्तीला घरी बसविण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांनी केले. ज्यावेळी इतिहास लिहीला जाईल त्यावेळी तुम्हा सर्व कार्यकर्ते यांचे नाव निश्‍चित घेतले जाईल. विधानसभेसाठी राणीताई लंके यांच्या उमेदवारीची एकमुखी मागणी करण्यात आली असून कार्यकर्त्यांच्या या भावना पक्षाच्या वरीष्ठांकडे पोहचविल्या जातील. 

बाबाजी तरटे (तालुकाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस)

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post