निलेश लंकेंसाठी रोहित पवारांचे मोठे विधान!, किती लीड देणार असल्याचा सांगितला आकडा

 


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - धनशक्ती विरोधात जनशक्ती, अशी ही लढाई असून, या लढाईत नीलेश लंके हे विजयी होतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.

रोहित पवार हे सोमवारी मोहटा येथे लंके यांच्या जनसंवाद यात्रेस उपस्थित राहणार होते. मात्र नियोजित कार्यक्रमामुळे उशीर झाल्याने त्यांनी उशिराने येऊन लंके यांची भेट घेऊन अर्धा तास  चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवारचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे, चांद मणियार उपस्थित होते. पवार म्हणाले की, माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून मला जेवढे मताधिक्य मिळाले, तेवढे मताधिक्य मी माझ्या मतदारसंघातून लंके यांना या निवडणुकीत देणार आहे. त्यांच्यासाठी संपूर्ण नगर दक्षिण मतदारसंघात मी स्वतः सभा घेणार आहे. लंके हे आमचे नेते शरद पवार यांच्या सोबत असल्याने सध्या मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य विरोधात बलाढ्य, अशी जरी ही लढाई असली, तरीही लोकशाहीची ताकद मोठी आहे. योग्य पद्धतीने प्रचार केल्यास लंके हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील.सात तारखेला बारामती मतदारसंघाचे मतदान पार पडणार असून, त्यानंतर आपण लंके यांच्या प्रचारात आणखी सहभाग घेणार आहोत. जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते लंके यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून, या निवडणुकीत लंके मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असेही पवार म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post