इतिहास साक्षी! कर्डीले सोबत असल्यावर पराभव पक्का, गाडेंनी सांगितले लंकेंच्या विजयाचे लीड

 


आमदार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा मोहटादेवी गडावरून शुभारंभ

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय नेत्यांनी तोडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सर्व सामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे.  महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात असलेल्या उमेदवारसोबत जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आहेत. दक्षिणेत इतिहास साक्षी आहे कर्डीले सोबत असल्यावर तो उमेदवार पडतो. गेल्या अनेक निवडणूकीतील हा अनुभव आहे. शिवाजी कर्डिले यांना पुन्हा आमदार होवू देणार नाही. त्यामुळे आमदार प्राजक्त तनपुरे जोरात प्रचार यंत्रणा कार्यान्वित करून सर्व सामान्य कुटुंबातील निलेश लंके यांना खासदार करा असे आवाहन करतानाच जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी राज्यात असलेल्या 48 मतदार संघांपैकी अहमदनगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार आमदार नीलेश लंके सर्वाधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला.सोमवारी (दि. १ एप्रिल) आमददार नीलेश लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा मोहटादेवी गडावरून शुभारंभ प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सह शिवसेना, काँग्रेस, आपच्या प्रमुख नेत्यांचा उपस्थितीत करण्यात आला.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विचारांची देशाला व राज्याला गरज आहे. देश अराजकतेकडे, हुकुमशाही कडे चालला आहे. कोरोना काळात ५० लाख लोक मृत्युमुखी पडले. परंतु नीलेश लंके यांनी देशात, राज्यात एक नंबर काम केले. मतदार संघांचे प्रश्न सोडविण्यासाठीलंके यांना दिल्लीला पाठवायचे असे असे ते म्हणाले.यावेळी अंकुश काकडे, आमदार लहु कानडे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, राजेंद्र दळवी, नगरसेवक योगीराज गाडे, वसंतराव पवार, बाळासाहेब बोराटे, संभाजी पावले, प्रताप शेळके, योगिता राजळे, ज्ञानदेव वाफारे, कारभारी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आमदार नीलेश लंके यांनी १ एप्रिल पासून जनसंवाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून मोहटादेवी गडावरून आमदार निलेश लंके यांची जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १५ दिवस यात्रा चालणार असून गावागावात जाऊन प्रश्न समजावून घेण्यासाठी व जनतेशी संवाद साधणार आहेत. 

यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके यांनीही विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post