विखेंनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले; गाडे, लंके, काकडे, कळमकर यांचा हल्लाबोल...काय म्हणाले पहा....



महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर -निर्यात बंदीमुळे कोसळलेले कांद्याचे भाव, दुधाच्या भावात झालेली घसरण यामुळे शेतकरी मोठया संकटात सापडला असून केंद्र व राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या विखे पिता पुत्रांनी शेतक-यांना मात्र वा-यावर सोडले असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केली.

         महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी बोलविण्यात आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आम आदमी पार्टीसह सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात गाडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, दादा कळमकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, प्रताप शेळके, शहराध्यक्ष किरण काळे, राणीताई लंके, शिवसेनेचे भगवान फुलसौंदर, संदेश कार्ले, अशोक गायकवाड, संभाजी कदम, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, नीलेश मालपाणी, रोहिदास कर्डीले, संपतराव म्हस्के यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



      प्रा.गाडे म्हणाले, शेतकऱ्यांबरोबरच शहरी भागातील नागरीकही त्रस्त आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याने वाढलेल्या प्रचंड महागाईस भाजपा सरकार पर्यायाने विखे-पिता पुत्र जबाबदार आहेत.

         राणीताई लंके म्हणाल्या, ही निवडणूक सर्वसामान्य नागरीकांनी हाती घेतली आहे. मतदारसंघात मतरदारांना मिळणारा उस्फुर्त पाठिंबा हे या निवडणूकीचे प्रमुख सुत्र बनले आहे. कार्यकर्त्यांनी सजग राहून प्रचारात सहभाग होण्याचे आवाहन लंके यांनी केले.



          राष्ट्रवादीचे निरीक्षक  अंकुश काकडे यांनी प्रचाराच्या पध्दती कशा बदलल्या आहेत याची उदाहरणे देत प्रत्यक्ष मतदरांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांना केले.

        अभिषेक कळमकर म्हणाले, उत्तरेतील काही हक्काचे कामगार त्यांचे डबे घेऊन दक्षिणेमध्ये गावोगावी मुक्कामी थांबणार आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या उत्तरेतील कामगारांवर करडी नजर ठेवावी.अशोक गायकवाड म्हणाले, आता गोळया, बंदूकीचे खोटे प्रचार करून विरोधक सहानभुती मिळविण्याचा केविलवाना प्रयोग विरोधकांनी केला. तो प्रयोगही फसला आहे. देशात घटना आणि संविधान राहिले तरच आपल्याला भविष्यात मतदान करता येणार आहे. भाजपा  देशाची घटना आणि संविधान हटविण्याचा प्रयत्न करते आहे. त्यांना यावेळी नागरीक योग्य जागा दाखवतील. संदेश कार्ले, किरण काळे, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.  

शेतकऱ्याच्या पोराने घाम फोडला !

गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ चार पिढयांपासून घरात सत्ता असल्याने सोन्याचा चमचा तोंडा घेउन जन्माला आलेेले हे पुत्र आहेत. त्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा, समस्या समजणार नाहीत. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातील सामान्य कार्यकर्त्याने त्यांना घाम फोडला आहे. निवडणूकीतही सर्वसामान्य मतदार त्यांना घाम फोडतील अशी चर्चा यावेळी कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.  

गाफील राहू नका

आगामी काळात विरोधक सत्ता मिळविण्यासाठी अपप्रचार करतील. कालची घटना गोळा आणि बंदूकीची बनावटगिरी उघडी पडली. कार्यकर्त्यांनी सावधपणे व सजग राहून प्रचार करावा. आता रात्र वैऱ्याची आहे. विरोधकांची नांगी ठेचण्यासाठी दक्षिणेतील सर्वसामान्य मतदार तयार झाले आहेत. उत्तरेतील भाडेकरी आता गावोगावी पांगतील. त्यांना जागीच रोखा.

अंकुश काकडे

पक्ष निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार        

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post