कोतवाली पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

 


 चौघे हद्दपार ; 'यांच्यावर' झाली कारवाई 

अहमदनगर / नगर सह्याद्री -

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील चार गुन्हेगारांना अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीतुन हद्दपार करण्यात आले आहे. कोतवाली पोलिसांनी त्यांना पकडून हद्दीच्या बाहेर सोडले.


कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम यांना महा. पोलीस कायदा कलम 56(1) (अ) (ब) अन्वये अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करणेबाबतचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयामार्फत उपविभागीय दंडाधिकारी साहेब, अहमदनगर यांना पाठविण्यात आले होते. यामध्ये सुनिल विठ्ठल शिरसाठ ( रा. बंगला नं. 9, पाच गोडावुन शेजारी, शाहुनगर रोड, केडगाव, अहमदनगर), क्षीतीज अरुन अबनावे (रा. निलकमल रौ हौसिंग सोसायटी, दत्त सायकल मार्ट जवळ, सारसनगर), अक्षय उर्फ भैरु बाबासाहेब कोतकर ( रा. देवी मंदीराजवळ, मोहीनीनगर, केडगाव),  अक्षय बाबासाहेब दातरंगे (रा. दातरंगे मळा, गाडगीळ पटांगण) यांचे हद्दपार मंजुर झालेबाबतचे आदेश पोलीस स्टेशनला प्राप्त झाले.  पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचे आदेशान्वये  चारही हद्दपार व्यक्तींना पोलीस स्टेशनला आणण्यात आले. त्यांचे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन त्यांना अहमदनगर जिल्ह्याचे स्थलसिमेच्या हद्दीबाहेर त्यांचे इच्छितस्थळी सोडणेकामी पोलीस अंमलदार यांचे सह रवाना केले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सपोनि रवींद्र पिंगळे, सपोनिरी. योगीता कोकाटे, पोउपनिरी सुखदेव दुर्गे, पो.हे.कॉ. तनवीर शेख, शाहीद शेख, मोहन भेटे, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, तानाजी पवार, प्रमोद लहारे, अतुल काजळे, सुरज कदम, सोमनाथ केकान, शिवाजी मोरे, महेश पवार, अभय कदम, अमोल गाडे, सुजय हिवाळे, अमोल गाडे, राम हंडाळ, राहुल मासाळकर यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post