आता ग्रामपंचायतींचा धुरळा; आमदार, खासदारांची गाव कार्यकर्त्यांना रसद....

 


माय नगर वेब टीम 

मुंबई - राज्य निवडणूक आयोगाकडून    ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभरातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या; तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 या दिवशी मतदान होणार आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली.


मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील.


नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. ०५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.


मतमोजणी ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.


निधन, अपात्र, राजीनामा यासह अन्य कारणांमुळे रिक्त असलेले २९५० ग्रामपंचायत सदस्य व व १३९ सरपंच यासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. आयोगाचे कार्यक्रमानूसार संबंधित तहसीलदार ६ ऑक्टोबरला नोटीस प्रसिद्ध करतील,


१६ ते २० ऑक्टोबरदरम्यान उमेदवारी अर्जाची प्रक्रिया, २३ ला उमेदवारी अर्जाची छाननी, २५ला उमेदवारी अर्ज माघार व चिन्ह वाटप होणार आहे. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये ५ नोव्हेंबरला मतदान व ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post