माय नगर वेब टीम
अहमदनगर -
मागिल वादाचे कारणावरुन मित्रानेचं मित्राचा खून केल्याची घटना घडली होती. या खुनाच्या गुन्ह्याची 24 तासाचे आत उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपीला जेरबंद केले आहे.
हकिगत अशी की, फिर्यादी श्साकीब उस्मान शाह (वय 20, धंदा मजुरी, रा. सुभेदारवस्ती, श्रीरामपूर) यांचा मयत भाऊ नामे शाहरुख ऊर्फ गाठण उस्मान शाह याचा कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन डोक्यात फरशी मारुन जखमी करुन जिवे ठार मारल्याने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि. दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोकॉ/रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ/ संभाजी कोतकर अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन ना उघड गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास तात्काळा रवाना केले. पथक मयताचे कुटूंबियाकडे विचारपुस करत असताना मयताचे कुटूंबियांनी काही दिवसांपुर्वी मयत शाहरुख याचे अशोक साळवे याचे बरोबर वाद झाला होता अशी माहिती दिली. पथकाने त्या आधारे संशयीताचा शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही. त्यामुळे पथकाचा संशय अधिक बळावला. पथकाने लागलीच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे त्याचा शोध घेता तो पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे येथे असले बाबत माहिती प्राप्त झाल्याने पथकाने लागलीच पिंपची चिंचवड, जिल्हा पुणे येथे जावुन संशयीत आरोपीचे ठाव ठिकाणाबाबत माहिती घेवुन तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेतले व त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक ऊर्फ बाबुरामा साळवे (रा. नॉर्दन ब्रॉच, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्याचेकडुन वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने माझे, मयत शाहरुख शाह याचे सोबत वाद झाला होता, त्याचा राग मनात धरुन डोक्यात फरशी मारुन खुन केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्वाती भोर मॅडम (अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर) व डॉ. बसवराज शिवपुजे, उविपोअ, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
Post a Comment