निंबळक चौकातील फ्लायओव्हरचे काम तात्काळ करा सरपंच प्रियंका लामखडे ; वाहतुकीचा खोळंबा

माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक बायपास चौकातील फ्लायओव्हरचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी सरपंच सौ.प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की,  निंबळक बायपास चौकात फ्लायओव्हर चे काम सुरू आहे. सदर चौकातून निंबळक, इसळक, खारे कर्जुने,  हिंगणगाव, नेप्ती, जखणगाव, भाळवणी येथील नागरिक ये- जा  करत असतात. तसेच औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार देखील याच रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे येथे वाहतुकीची मोठी वर्दळ असते.         सद्यस्थितीत फ्लायओव्हरचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मोठ्या प्रमाणातील वाहतुकीमुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच परिसरात अपघात वाढण्याची शक्यता असल्याने सदर फ्लायओव्हरचे काम लवकर पूर्ण करण्याची गरज आहे.

         निंबळक बायपास चौकातील फ्लायओव्हरचे  काम पूर्ण झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांची अडचण लक्षात घेता लवकरात लवकर फ्लायओव्हर चे काम पूर्ण करण्याची मागणी सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post