निंबळकचा मुख्य चौक होणार 'ग्रीन अँड क्लीन' सुशोभीकरणाचा शुभारंभ ; आ. लंके तसेच ग्रामपंचायतचा पुढाकार

 माय अहमदनगर वेब टीम



नगर तालुका- -गेल्या कित्येक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या निंबळक येथील दत्त मंदिर चौकाचे भव्य असे सुशोभीकरण होणार आहे. सुशोभीकरणानंतर निंबळक चा मुख्य चौक ग्रीन अँड क्लीन बनणार आहे. 
      चौकाच्या सुशोभीकरणासाठी३५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती सरपंच प्रियंका लामखडे यांनी दिली. दत्त मंदिर चौकाचे सुशोभिकरणाचे निंबळक कराचे स्वप्न आता पुर्ण होणार आहे. या कामाचा शुंभारभ करण्यात आला. येथील दत्त मंदिर चौक परिसर हा गावातील मुख्य चौक आहे.  एमआयडीसी , मनमाड, पुणे, कल्याण महामार्गाला जाण्यासाठी या चौकातून जावे लागते. येथे चोवीस तास  रहदारी तसेच वर्दळ असते.  या चौकात अतिक्रमण झाल्यामुळे या चौकाचा श्वास कोंडला होता. या चौकाचे विद्रूपीकरण झाले होते. अपघाताचे प्रमाण ही वाढले होते. या चौकात सुशोभीकरण करण्यासाठी सरपंच प्रियंका लामखडे यांनी आमदार निलेश लंके यांच्याकडे मागणी केली असता या चौकासाठी वीस लाख रुपयांचा निधी, तसेच ग्रामपंचायतमधून पंधरा लाख रुपये असे असा ३५ लाख रुपयांचा निधी खर्चुन दत्त मंदिर चौकाचे सुशोभिकरण होणार आहे. 
         कामाचा शुभारंभ रविवार दि ४ रोजी करण्यात आला. या चौक सुशोभीकरणाचा मास्टर फ्लॅन तयार करण्यात आला असून चौकात चहुबाजूने नारळाची झाडे लावण्यात येणार आहेत .मध्यभागी गोल आकाराचे सर्कल केले जाणार आहे. तसेच  आमदार लंके यांनी पंधरा लाख रूपायाचे  २२  पथदिवे दिले आहेत. स्मशान भूमी रस्ता, तसेच रेल्वे स्टेशन या भागामध्ये पथदिवे लावण्यात येणार आहे. या अगोदर ही निंबळक रेल्वे गेट ते दत्त मंदिर चौकापर्यत आ. लंके यांनी पथदिवे दिलेले आहेत. आता संपुर्ण गाव पथदिव्याच्या प्रकाशाने उजाळणार आहे.
      खंडोबा मंदिरात क तिर्थक्षेत्रा वर्गातून पंधरा लाख रुपयाचे पेव्हींग ब्लॉक बसावीण्यात येणार असल्याची माहिती युवा उद्योजक अजय लामखडे यांनी दिली. 
       यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, माजी पंचायत समितीचे उपसभापती डॉ. दिलीप पवार, अजय लामखडे, बाळासाहेब  कोतकर, दत्तू दिवटे, सोमनाथ खांदवे, बाबासाहेब पगारे, किरण कळसे, राजू मगर, नितीन लवांडे,बबन कोतकर, चेतन काळेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
_________________________________
निंबळक येथील दत्त मंदिर चौकाचे सुशोभीकरण झाल्यानंतर गावची शोभा वाढणार आहे. सुशोभीकरणासाठी ग्रामपंचायत तसेच आमदार निलेश लंके यांनी पुढाकार घेतल्याने काम मार्गी लागणार आहे. आमदार निलेश लंके यांचे प्रत्येक गावात बारीक लक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघाचा कायापालट झाला आहे. निंबळक गावासाठी ही त्यांनी भरपूर निधी दिल्याने विविध विकास कामे करता आली.
.....सौ.प्रियंका लामखडे (सरपंच, निंबळक)
__________________________
आमदार निलेश लंके यांनी निंबळक गावामध्ये विविध विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे. त्यांनी दिलेल्या निधीतून निबळक गावात विविध विकास कामे झाले आहेत. निंबळक प्रमाणेच आमदार लंके हे मतदार संघातील प्रत्येक गावात विकास कामे करण्यावर भर देत असल्याने निंबळक ग्रामस्थांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
____________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post