माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका (शशिकांत पवार)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील यशश्री अकॅडमी मध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी मोठ्या संख्येने पालकांचा प्रयत्न असतो. बाल वयातच मुलांवर चांगले संस्कार, शिक्षण, खेळ, आरोग्य यासाठी नावाजलेल्या यशश्री अकॅडमी मध्ये नूतन २०२३-२४ वर्षाकरिता अखेर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पाल्यांना ॲडमिशन मिळवण्यासाठी प्रयत्नात असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
यशश्री अकॅडमीच्या प्री-स्कूल सावेडी व प्री-स्कूल जेऊर येथे प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याची माहिती अकॅडमीच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली. उच्चशिक्षित तसेच विद्यार्थ्यांची काळजी घेणारा कर्मचारी वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, सुंदर आणि प्रशस्त इमारत, वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन, दप्तराचे कमी ओझे, सोयीस्कर वेळ, सुरक्षित परिसर, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन हे यशश्री अकॅडमी चे वैशिष्ट्य आहेत.
आजपर्यंत येथील विद्यार्थी अभ्यासाबरोबर विविध खेळात देखील चमकलेले आहेत. यशश्री अकॅडमी मध्ये शिस्त, संस्कार, अभ्यास तसेच खेळ या बाबींवर विशेष लक्ष दिले जाते. अकॅडमीच्या संचालिका सौ. अनुरीता शर्मा व यश क्रिएटिव्हचे अध्यक्ष यश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांच्या सहकार्याने अकॅडमीचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चिले जात आहे.
येथील प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने पालकांमध्ये देखील समाधानाचे वातावरण असून आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. यशश्री अकॅडमीच्या प्रवेशासाठी सौ. प्रज्ञा जोशी (मो. ९५१८९६७२१५) यशश्री प्री-स्कूल सावेडीसाठी सौ. तानिया वाधवाणी (मो. ८४११८२००१७) यशश्री प्री- स्कूल जेऊर साठी सौ. मनीषा पवार( मो.७०२०८९७०५९) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आले आहे.
________________________
येथेच घडते आयुष्य.....
यशश्री अकॅडमी मध्ये अभ्यासाबरोबर सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. खेळ, संस्कार, शिस्त, अभ्यास अन् सामाजिक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्यात येते. बाल वयातच संस्कार, संस्कृती आणि अभ्यासाची गोडी विद्यार्थ्यांना लावण्यात येते. त्यामुळे येथे प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
..... सौ अनुरीता शर्मा ( संचालिका, यशश्री अकॅडमी )
_______________________________
विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य हे सर्वस्वी शिक्षकांच्या हातात असते. कुंभार ज्याप्रमाणे आपल्याला हवा त्याप्रमाणे मातीला आकार देऊन वस्तू घडवतो. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न, एकीची भावना, अभ्यास, संस्कार, खेळाचे महत्व, शिस्त याबाबींचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले जाते. पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जात नाही. त्यामुळे पाल्याचा प्रवेश घेऊन पालक देखील चिंतामुक्त होतात.
...... राजेंद्र पवार ( शिक्षक यशश्री अकॅडमी)
_______________________________
Post a Comment